Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर विशेष पुरस्कार प्रदान

Pm narendra modi address in lata mangeshkar award program : उषा मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आला गौरव
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर विशेष पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लता मंगेशकर विशेष पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. लता मंगेशकर यांच्या भगिनी तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांचा गौरव करण्यात आला.

पंतप्रधाम मोदी यांना सर्वोत्कृष्ट जनसेवेसाठीचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे, चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कारकीर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ, तर नूतन मुंबई टिफिन चॅरिटेबल ट्रस्ट यांना सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उषा मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्वरलतांजली या खास कार्यक्रम होणार आहे.

Related Stories

No stories found.