
PM Modi Mother: अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आई हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांची प्रकृती खालावल्याची माहिती सध्या समोर येत आहे. उपचारासाठी त्यांना तात्काळ अहमदाबादमधील (Ahmedabad) यूएन मेहता या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. शंभरी पार केलेल्या हीराबेन यांची प्रकृती अचानाक का खालावली याबाबत नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. (pm narendra modi mother heeraben modi hospitalized at mehta hospital in ahmedabad)
हीराबेन या गुजरातमधील गांधीनगर येथील रायसन गावात त्यांचा धाकटा मुलगा पंकज मोदी यांच्यासोबत राहतात. हीराबेन यांनी यावर्षीच्या 18 जून 2022 रोजी शंभरी गाठली आहे. आईच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींंनी त्यांची भेट घेतली होती. ज्यानंतर हिराबेन यांच्या शंभरीबाबत चर्चेला बरंच उधाण आलं होतं.
यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या आईसोबतचे काही फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटलाही शेअर केले होते. ज्यावर अनेक यूजर्सने त्यांचं कौतुक केलं होतं. मोदींसाठी त्यांची आई ही सर्वात जवळची व्यक्ती आहे. ते नेहमी म्हणतात की, 'जगाचा कोणताही कानाकोपरा असो, प्रत्येक मुलाच्या हृदयातील सर्वात अनमोल ममता ही आईसाठी असते. आई केवळ आपले शरीरच बनवत नाही तर आपले मन, आपले व्यक्तिमत्व, आपला आत्मविश्वास देखील घडवते.'
हीराबेन या आज घडीला 100 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत आणि तरीही त्या खूप सक्रिय आहेत. या वर्षी जून महिन्यात त्यांनी आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले होते.
पंतप्रधान मोदी हे स्वत:च्या वाढदिवशी देखील गुजरातमध्ये जाऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यावेळी आई-मुलामधील नेमकं नातं देखील जगासमोर आलं आहे. असं असताना आता जेव्हा हिराबेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा नक्कीच पंतप्रधान मोदी देखील हळवे झाले असणार. मात्र, याबाबत अद्याप तरी त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.