डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पैलवान सागरचा मृत्यू, सुशील कुमारच्या अडचणींमध्ये भर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पैलवान सागर राणाच्या मृत्यू प्रकरणात सुशील कुमारच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. २३ वर्षीय पैलवान सागर राणाचा पोस्टमार्टम अहवाल आला असून यात सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ४ मे रोजी छत्रसाल स्टेडीयममध्ये सागर राणा आणि त्याच्यासोबत काही पैलवानांना सुशील कुमार आणि इतरांनी मारहाण केली होती.

Sushil Kumar Arrested : ऑलिम्पिक पदक विजेता ते हत्येचा आरोपी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं?

सागरच्या डोक्यावर जड वस्तूने जोरात मारल्याचं निशाण आहे…तसेच त्याच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झालेल्या आहेत. काही ठिकाणी मारहाणीमुळे जखम होऊन शरीराचा भाग काळा-निळा पडला आहे. ५ मे रोजी रात्री २ वाजून ५२ मिनीटांनी पैलवान सागर राणाला उपचारासाठी दिल्लीच्या BJRM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र यानंतर त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जेव्हा सुशील कुमारच्या हट्टामुळे महाराष्ट्राच्या नरसिंग यादवचं ऑलिम्पिक स्वप्न भंगलं होतं

ज्यानंतर सकाळी सात वाजल्याच्या दरम्यान सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सागरला पैलवानांनी इतकी भीषण मारहाण केली की जखमा या हाडापर्यंत पोहचल्या आहेत. सागर राणाने आपल्या मृत्यूआधी दिल्ली पोलिसांना दिलेल्या जवाबात सुशीलने आपल्याला मारहाण केल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुशीलविरोधात FIR दाखल केला होता. यानंतर सुमारे ३ आठवडे फरार असलेला सुशील २३ मे रोजी दिल्लीत पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

ADVERTISEMENT

Chatrasal Murder Case : खिशातले पैसे संपले, सुशील बाहेर पडला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT