Kashmir Files वर प्रकाश राज यांची कमेंट, ‘लोक लायकीप्रमाणे..’ अनुपम खेर यांचा संताप!

रोहिणी ठोंबरे

Prakash Raj Comment On Kashmir Files Anupam Kher Reacts दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने 2022 मध्ये पडद्यावर दहशत निर्माण केली. यावर्षी ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण होईल.तरीही या चित्रपटाबाबत वाद सुरूच आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी ‘द […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Prakash Raj Comment On Kashmir Files Anupam Kher Reacts

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने 2022 मध्ये पडद्यावर दहशत निर्माण केली. यावर्षी ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण होईल.तरीही या चित्रपटाबाबत वाद सुरूच आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘प्रोपगंडा फिल्म’ संबोधून ‘नॉनसेन्स’ म्हटलं होतं. यानंतर, विवेक अग्निहोत्रीनं त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. त्याचवेळी आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही प्रकाश राज यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला लोकांचं प्रेम मिळालं तर त्याचबरोबर तो वादातही सापडला. चित्रपटाबाबतचे वाद अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीत लोक शब्दांचे बाण वापरत घणाघाती टीका करत आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: राज्यभरात शिवजंयतीचा उत्साह, आग्र्यातही शिवरायांचा जयघोष

हे वाचलं का?

    follow whatsapp