महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा पूर्वनियोजित कट, यशमोती ठाकूर यांचा आरोप

मुंबई तक

अमरावती जिल्ह्यात 12 आणि 13 नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा धक्कादायक आरोप अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भाजपा नेत्यांनी याप्रकरणी पोलिसांसमोर समर्पण केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता अशा पद्धतीची माहिती आणि अहवाल नोडल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावती जिल्ह्यात 12 आणि 13 नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा धक्कादायक आरोप अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भाजपा नेत्यांनी याप्रकरणी पोलिसांसमोर समर्पण केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता अशा पद्धतीची माहिती आणि अहवाल नोडल एजन्सी असलेल्या सायबर विभागाने दिला आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय विखारी पोस्ट आणि प्रचार दोन्ही बाजूंच्या कट्टरतावादी विचारांच्या लोकांमार्फत करण्यात आला असे सायबर विभागाच्या अहवालावरून दिसून येते. कारण यामुळे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा कोणाला होईल हे स्पष्टच आहे. असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

12 आणि 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या हिंसाचारामागे दोन्ही बाजुंच्या कट्टरवादी गटांचा एकत्रितरित्या समावेश होता तसेच या माध्यमातून नेमका कुणाला फायदा होणार हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे.

यशोमती ठाकूर, पालकमंत्री

दरम्यान सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार 12 व 13 नोव्हेंबर ला #AmravatiVoilence हा हॅशटॅग वापरुन अवघ्या काही मिनिटांतच चार हजार ट्विट्स तसेच पोस्ट करण्यात आलेत तसेच ट्विटर,फेसबुक आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून केलेल्या पोस्ट ह्या अत्यंत भडक आणि भावना भडकवणाऱ्या होत्या. तर त्या सोबत जोडण्यात आलेल्या चित्रफिती ह्या चुकीची माहिती देऊन विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणाऱ्या होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp