पुणे: रस्तावरुन जाणाऱ्या 12 वर्षाच्या मुलाच्या डोक्यातच घुसली सळई, Video व्हायरल

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुण्यातील मुंढवा येथे एका 12 वर्षीय मुलाच्या डोक्यात थेट उंचावरुन पडलेली सळई घुसल्याचा अत्यंत धक्कादायक व्हीडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मात्र, यातील दृश्य अत्यंत विचलित करणारी आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा येथील एका इमारतीवरून केबल ओढण्याचे काम सुरू होते. याच वेळी त्या इमारतीच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरुन एक 12 वर्षाचा मुलगा जात होता. पण याचवेळी इमारतीच्या वरच्या भागातून पडलेली सळई थेट मुलाच्या डोक्यातच घुसली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा सगळा प्रकार पापणी लवण्याचा आत घडला. त्यामुळे मुलाला देखील काय झालं ते कळलं नाही. त्यामुळे तो डोक्यात घुसलेली सळई घेऊन काही पावलं तसाच पुढे गेला आणि नंतर जमिनीवर कोसळला. आता या प्रकरणी राजेश भारती याच्यासह दोन कामगारांविरोधात मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबर 2021 रोजी 12 वर्षीय चेतन नावाचा मुलगा हा दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पायी चालत जात होता. त्याच वेळी इमारतीवर केबल ओढण्याचे काम सुरू होते.

ADVERTISEMENT

पण काही समजण्याच्या आतच त्याच्या डोक्यात थेट लोखंडी सळई घुसली. यामध्ये तो काही क्षणात खाली कोसळला. यावेळी जवळील नागरिकांनी त्याला उचलून तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना पती-पत्नी गेले गाडी खाली; कल्याण स्थानकावरील थरार

या प्रकरणी राजेश भारती याच्यासह दोन कामगार विरोधात मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या तीनही जणांना लवकरच अटकही केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चेतनच्या कुटुंबीयांना देखील प्रचंड धक्का बसला आहे. रस्त्यावरुन जाताना थेट मोठी सळई चेतनच्या डोक्यात घुसल्याने त्याच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. मात्र, त्याला वेळीच उपचार मिळाल्याने सध्या त्याची प्रकृती ही स्थिर असल्याचे समजते आहे. या सगळ्या प्रकाराला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील सध्या केली जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT