Pune : आंबील ओढा परिसरात तोडक कारवाई, रहिवासी आक्रमक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील आंबील ओढा परिसरात तोडक कारवाई करण्यात आल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. बिल्डर्सच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्याजवळची घरं पाडण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी केदार असोसिएट्सने नोटीसा दिल्याचा आरोप केला होता. नागरिकांनी या नोटिसांवर तारीख नसल्याचं म्हटलं होतं.

दोन वर्ष आधी आंबील ओढ्याचा पुराने भयानक नुकसान झाले ह्यांचे कारण आंबील ओढयाचे नैसर्गिक वळण राहिलेले नाही. तिथले वळण सरळ करणे आवश्यक आहे असे मत महापालिका सभागृह नेता आणि बीजेपी नगरसेवक गणेश बिड़कर यांनी म्हटलं आहे. बिडकर यांच्या म्हणण्यानुसार आंबील ओढयाचा पूर थांबवायचा असेल तर वळण – सरळ करणे आवश्यक आणि सोबत या परिसरातील लोकांना पक्क घर SRA च्या अंतर्गत दिलं जात आहे. 600 लोकांना मंजुरी दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कारवाईचं काम पुणे महापालिकेकडून प्रस्तावित नाल्याचं अतिक्रमण काढण्याचं काम सुरु आहे. 26 मार्च 2021 रोजी सर्वांना नोटीस दिली होती. त्या नोटीसचे फ्लेक्स त्या ठिकाणी लावले होते. पेपरमध्येही जाहिरात पब्लिश करण्यात आलं होतं. प्रस्तावित नाला आहे, जो महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुरु आहे. 300-400 झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाणी शिरतं.

सदरची नोटीस टाऊन प्लॅनिंग नकाशा 1974, विकास आरखडा 1987 ,टाऊनप्लॅनिंगनुसार 2017 नाला सरळीकरण काम नियमानुसार आहे. लोकांना बेघर करत नसून, SRA मार्फत ट्रान्झिट कॅम्प मिळाला आहे. केदार असोसिएटला ट्रान्झिट कॅम्प मिळालाय त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये कुणाला कोणता फ्लॅट हे केदार असोसिएटच्या लेटरहेडवरुन लोकांना कळवलं आहे. लोकांना बेघर करण्याचा प्रश्न नाही, राजेंद्रनगर एरिया आहे, तिथे यांची सदनिका दिली आहे ट्रान्झिट कॅम्पमध्ये दिली आहे. विना मोबदला सदनिका दिल्या जाणार आहेत. त्यांना तिथून काढल्यानंतर कायमस्वरुपी शिफ्ट केलं असं नाही, योजनेचं काम झाल्यावर तिथे शिफ्ट केलं जाईल.

ADVERTISEMENT

ट्रान्झिट कॅ्म्प आहे, टोटल नालाबाधित 134 लोक आहेत, त्यापैकी 70 लोकांचं आधीच पुनर्वसन झालं जेव्हा महापालिकेची नोटीस आली.. हे मागच्या चार महिन्यात झालं… जे शिल्लक राहिले आहेत, ज्यांच्यामुळे नाल्याचं काम अडतंय, त्यांच्याशी बैठका घेतल्या, चर्चा केली, पाठपुरावा केली, त्यांनी सहकार्य केलं नाही त्यामुळे महापालिकेने कारवाई केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT