Rupali Patil Thombare: पुण्यात मनसेला धक्का! रुपाली पाटील-ठोंबरेंनी दिला राजीनामा

मुंबई तक

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) रणरागिणी अशी ओळख असलेल्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. बुधवार (14 डिसेंबर) पासून त्यांच्या पुणे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) रणरागिणी अशी ओळख असलेल्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. बुधवार (14 डिसेंबर) पासून त्यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात होणार आहे. असं असतानाच राज ठाकरे यांची भेट न घेताच रुपाली पाटील यांनी आपला राजीनामा दिला आहे.

पुण्यातील मनसेच्या अत्यंत आक्रमक नेत्या अशी रुपाली पाटील यांची ओळख होती. मनसेचं पुण्यातील सर्वात चर्चेत असणारं नाव रुपाली पाटील-ठोंबरे यांचं होतं. महाराष्ट्रभर सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोविंग देखील प्रचंड आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनामा देण्याने पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे.

पुण्यात आता लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मनसेनं पुण्यात पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील गेल्या अनेक महिन्यात पुण्याच्या दौऱ्यावर अनेकदा आल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, असं असताना आता रुपाली पाटील यांच्यासारख्या कडवट मनसे नेत्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाची चिंता वाढली आहे.

महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना रुपाली पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणं हे मनसेसाठी नक्कीच चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे आता याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp