पुण्यात कोयता गँगची दहशत आहे म्हणता, मग तुम्ही गृहमंत्री अपयशी आहेत म्हणणार का? अजित पवारांचं उत्तर ऐकाच
Ajit Pawar on Devendra Fadnavis : "शहरात गुंडागर्दी वाढली आहे, तरुण पिढी वाया जात आहे आणि नवीन व्यावसायिकांनाही धमकावलं जात आहे", अशी भूमिका मांडत अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपला घेरलेलं पाहायला मिळालं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात कोयता गँगची दहशत
तुम्ही गृहमंत्री फडणवीस अपयशी आहेत म्हणणार का?
अजित पवाराचं उत्तर ऐकाच
Ajit Pawar on Devendra Fadnavis, Mumbai : गेल्या काही वर्षात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सातत्याने कोयता गँगने दहशत पसरवलेली पाहायला मिळाली. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनेक सभा-मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला. "पिंपरी-चिंचवडसारख्या आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिकेची अवस्था बिकट झाली आहे. ज्यांच्या हाती तुम्ही सूत्रे दिली, त्यांनी शहर नीट सांभाळलं नाही. टँकर माफिया, दहशत, दादागिरी, हफ्तेवसुली, कोयता गँग यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. शहरात गुंडागर्दी वाढली आहे, तरुण पिढी वाया जात आहे आणि नवीन व्यावसायिकांनाही धमकावलं जात आहे", अशी भूमिका मांडत अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपला घेरलेलं पाहायला मिळालं.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत? असं म्हणणार का? अजित पवारांचं प्रत्युत्तर
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत देखील कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा बोलून दाखवला. "मात्र, तुम्ही कोयता गँगची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहशत आहे म्हणत आहात. मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत? असं म्हणणार का?", असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. याबाबत त्यांनी भाष्य केलंय.
अजित पवार उत्तर देताना म्हणाले, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँग आहे. अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात एक ग्रुप येतो. टू व्हिलर असतील त्या जाळून टाकतो. फोर व्हिलरच्या काचा फोडून टाकतो. स्थानिक लिडरशीपचा वरदहस्त या सगळ्या गँगला आहे, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांबाबत बोलणे टाळलेले पाहायला मिळाले.
हेही वाचा : अहिल्यानगर : कंदुरीच्या कार्यक्रमात मित्रांमध्ये वाद, बोकड कापण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या










