राज ठाकरेंनी दादागिरी करण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर…; रामदास आठवलेंनी थोपटले दंड
मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोध केला आहे. राज ठाकरेंनी दादागिरी केली, तर त्यांना ‘ईट का जबाब पत्थर से’ अशा स्वरुपात उत्तर देऊ, असा इशारा आठवलेंनी राज ठाकरेंना दिला आहे. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे गोंदिया दौऱ्यावर आले होते. यावेळी […]
ADVERTISEMENT

मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोध केला आहे. राज ठाकरेंनी दादागिरी केली, तर त्यांना ‘ईट का जबाब पत्थर से’ अशा स्वरुपात उत्तर देऊ, असा इशारा आठवलेंनी राज ठाकरेंना दिला आहे.
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे गोंदिया दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे यांच्या भोंगे हटवण्याच्या मागणीबद्दल रामदास आठवले यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी भूमिका मांडताना राज ठाकरे यांच्या मागणीला विरोध केला. त्याचबरोबर अयोध्येला जाणार असाल, तर रिकाम्या हाताने जाऊ नका, असा चिमटाही काढला.
रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरेंना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी चुकीची भूमिका घ्यायला नको. जर मंदिरात भोंगे लावायचे असतील तर ते लावू शकतात, पण मशिदींवरील भोंगे हटवण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे.