राणांची नवी रणनिती, जामीनासाठी अर्जच करणार नाही!

मुंबई तक

अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांना आणि त्यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. उद्या म्हणजेच रविवारी त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 153 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय खार पोलीस ठाण्यात शिवसैनिकांविरोधात नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केली आहे. कट करुन आमच्याविरोधात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांना आणि त्यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

उद्या म्हणजेच रविवारी त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 153 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय खार पोलीस ठाण्यात शिवसैनिकांविरोधात नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केली आहे.

कट करुन आमच्याविरोधात भाषणबाजी करण्यात आली, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

नवनीत आणि रवी राणा हे जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ही अटक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय केल्याचे नवनीत यांच्या वकिलाने म्हटलं आहे.

दुसरीकडे राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. याच तक्रारीनंतर खार पोलिसांनी नवनीत राणा यांना पोलीस ठाण्यात नेऊन अटक केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp