बलात्काराचा आरोपी टॅटूमुळे का सुटला ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तकः दिल्ली हायकोर्टातील बलात्काराच्या आरोपीची टॅटूमुळे सुटका झाली आहे. जस्टीस रजनीश भटनागर यांनी याचिकेवरील सुनावणीत बलात्काराच्या आरोपीला एका टॅटूच्या आधारे अवघ्या 25 हजारांच्या जातमुचलक्यार जामिनावर सोडलं.

दिल्ली हायकोर्टातील याचिकेनुसार आरोपी संजय 2016 ते 2019 या काळात पिडीतेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार करत असल्याचे आरोप होते. पिडीतेच्या आरोपावर संजयला जून 2020 पासून तुरुंगात टाकण्यात आले होते. हायकोर्टातील सुनावणीच्यावेळी आरोपी संजू याने हायकोर्टाला दिलेल्या त्याच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले.

आरोपीने पीडित तरुणीचे नग्न फोटो काढून ते मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवले होते आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर बालत्कार करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. यावर संजू याने हे आरोप खोटे असून दोघांच्या सहमतीने सर्व काही झाल्याचं कोर्टाला सांगितलं. यावर कोर्टाला विश्वास बसावा यासाठी पुरावा म्हणून त्याने तरुणीच्या हातावरील टॅटू तपासण्याची विनंती केली. तसंच या टॅटूचा एक फोटो तिने संजू याला ईमेलने पाठविल्याबद्दलही कोर्टाला माहिती देण्यात आली. आरोपीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणीने हा टॅटू तिच्या हातावर गोंदून घेतला आणि त्याचा फोटो काढून आरोपीला ईमेल केल्याचं आरोपीने कोर्टाला सांगितलं. पण तरुणीचं यावर म्हणणं होतं की हा टॅटू तिच्या हातावर जबरदस्तीने गोंदवण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आरोपीने आणि पीडितेने दिलेली माहिती याची कोर्टाने याची पडताळणी केली. त्यावर तरुणीच्या हातावर असलेला टॅटू हा जबरदस्तीने कोरला नसल्याचे हायकोर्टाने सांगितले. पीडितेच्या हातावर गोंदलेला टॅटू हा अत्यंत कोरीव पद्धतीने गोंदलेला आहे. तेव्हा तो जबरदस्तीने गोंदला नसल्याचं जस्टीस भटनागर यांनी सांगितलं. युवतीच्या आरोपानुसार आरोपीचा मोबाईलही चेक करण्यात आला होता. त्यावर कोणतेही धमकीचे मेसेज दिसले नाहीत. बलात्काराची तक्रार उशीरा देणेही युवतीच्या विरोधात गेले.

बलात्काराच्या आरोपीला पीडितेच्या हातावरील टॅटूने वाचवलं असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. पण तरिही कोर्टाने आत्ता दिलेला निर्णय सादर केलेले पुरावे आणि हे या याचिकेवरील मूळ सुनावणीवर निर्णय घेताना विचारात घेतल्या जाणार नाहीत असंही यावेळी कोर्टाने सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT