लातूर हादरलं ! १५ वर्षीय मुलीवर तीन महिन्यांपासून बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार
महाराष्ट्रात स्त्री आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होताना दिसत आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील तुंगी गावात आरोपीने सलग तीन महिन्यांपासून १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करुन गर्भपात करण्यात आला. यानंतर याप्रकरणी पोलिसांत […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात स्त्री आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होताना दिसत आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील तुंगी गावात आरोपीने सलग तीन महिन्यांपासून १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करुन गर्भपात करण्यात आला. यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. ज्यावरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. तुंगी गावातील 31 वर्षीय आरोपीने स्वतःच्या घर शेजारी राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला.
डोंबिवलीत चाललंय काय? इन्स्टाग्रामवरुन ओळख वाढवली, अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक
सदरची पीडित मुलगी 3 महिन्याची गरोदर राहिली तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून गर्भपात करण्यात आला आहे आवश्यक नमुने रासायनिक तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवलं असून महिला तक्रार निवारण केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली गीते यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.