पुण्यात निवृत्त कर्नलने गोळी झाडून केली पत्नीची हत्या, स्वत:लाही संपवलं
पुणे: पुण्यातील मुंढवा परिसरात राहणार्या सेवानिवृत्त कर्नलने पत्नीची डबल बोअरच्या बंदुकीतून 2 गोळ्या झाडून हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर कर्नलने स्वतःवर देखील 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा (वय 75 वर्ष) आणि चंपा नारायण सिंग बोरा (वय 63 वर्ष) […]
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील मुंढवा परिसरात राहणार्या सेवानिवृत्त कर्नलने पत्नीची डबल बोअरच्या बंदुकीतून 2 गोळ्या झाडून हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर कर्नलने स्वतःवर देखील 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा (वय 75 वर्ष) आणि चंपा नारायण सिंग बोरा (वय 63 वर्ष) अशी मयत दोघांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा यांना तीन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा वडिलांना सकाळपासून फोन करीत होता. पण काही प्रतिसाद मिळत नव्हता.
तेव्हा मुलाने त्याच्या मित्राला फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले. तरी देखील कोणत्याही प्रकाराचा आतून प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यावर निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा आणि त्यांची पत्नी चंपा नारायण सिंग बोरा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तर मृतदेहच्या बाजूला बंदूक देखील होती.
त्यामुळे यातून सुरुवातीला पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच या घटनेमागील नेमकं कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.