राजकारण आणि रबरी ‘लिंग’

Abhinn Kumar

‘आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतो. वाक्य ऐकायला खूप दिलासादायक वाटतं. पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब शोभून दिसत नाही अध्यक्ष महाराज’ हे वाक्य आमदार, मंत्र्यांनी हजारो वेळा तरी सभागृहात म्हटलं असेल. पण आपल्याला जर महिला धोरणातला ‘लिंग समभाव’ या शब्दातील ‘लिंग’ हा शब्दच खटकत असेल तर आणि आरोग्य विभागाने वाटलेल्या किटमध्ये असलेल्या रबरी लिंगाबद्दलच्या विषायवरच बोलायला लाज वाटत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतो. वाक्य ऐकायला खूप दिलासादायक वाटतं. पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब शोभून दिसत नाही अध्यक्ष महाराज’ हे वाक्य आमदार, मंत्र्यांनी हजारो वेळा तरी सभागृहात म्हटलं असेल. पण आपल्याला जर महिला धोरणातला ‘लिंग समभाव’ या शब्दातील ‘लिंग’ हा शब्दच खटकत असेल तर आणि आरोग्य विभागाने वाटलेल्या किटमध्ये असलेल्या रबरी लिंगाबद्दलच्या विषायवरच बोलायला लाज वाटत असेल किंवा बोलायचं नसेल तर?

तर आधी सध्या आजच्या विषयावर बोलूयात. तो म्हणजे आरोग्य विभागाने कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये बुलढाणा जिल्ह्यात रबरी लिंग दिलं. यावरुनच भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी टीका करताना ‘लिंगपिसाटांचा उच्छाद’ अशा शब्दात ठाकरे सरकारवर टीका तर केलीच. त्याचबरोबर ठाकरे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल केला. इतकंच नाही तर असं कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये रबरी लिंग देण्याबद्दल विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

पण याच बाबीवर जेव्हा काही आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला काहींनी त्याबाबत बोलायला नापसंती कशी दर्शवणार म्हणून मग विषयच माहित नसल्याचा कांगावा केला. चला विषय माहित नाही असं समजूयात. पण माहित पडल्यावर एकट्या विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘स्त्री-पुरुष यांच्या संबंधांबाबत वैज्ञानिक माहिती द्यायला काहीच हरकत नाही. गैरसमज पसरवला जाईल अशी विधाने राजकीय नेत्यांनी करू नयेत अन् आरोग्यविषयक मुद्द्यांचे राजकारण करू नका.’ अशा शब्दात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या.

पण, अगदी अनेक विषयांवर औचित्याचा मुद्दा मांडत सरकारला सवाल करणाऱ्या आमदारांनी यावर प्रश्न विचारला नाही. किंवा स्वत: आरोग्य विभागाच्या मंत्री राजेश टोपे यांनी यावर माहिती दिली नाही. आरोग्य विभागाकडून माहिती देताना आरोग्य विभागाच्या संचालिका अर्चना पाटील यांचंच स्टेटमेंट पुढे करण्यात आलं किंवा माध्यमांना देण्यात आलं.

एरव्ही आरोग्यमंत्री वेगवेगळ्या विषयांवर माध्यमांना स्वत: प्रतिक्रिया देतात. मात्र त्यांनीही ही जबाबदारी आरोग्य संचालकांवर सोडून दिली. त्यांच्यासाठी हा विषय तितकासा महत्त्वाचा नसावा कदाचित. आरोग्य मंत्र्यांनी यावर सभागृहात माहिती देऊन किंवा स्वत: व्हीडिओ प्रतिक्रिया देऊन एक महत्त्वाच्या विषयाची माहिती द्यायला काहीच हरकत नव्हती.

दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच महिला दिनी येणाऱ्या महिला धोरणाबाबतही असंच काही घडल्याचं समोर आलं आहे. महिला धोरणाच्या नावातील ‘लिंग समभाव’ या शब्दातील लिंग या शब्दाला आक्षेप घेण्यात आला. तसंच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातल्या लिंग शब्दावर महिला आमदारांनी आक्षेप घेतला आहे.

उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या धोरणालाच मान्यता दिली आहे. यावर महिला बालविकास विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी इतर काही मुद्दे आहेत जे नव्याने सुचवले काही बदलायला सांगितल्याचं सांगितलं. तसंच याबाबत अधिक सर्वसमावेशी धोरण तयार करण्यावर भर असेल अशी माहिती दिली. अर्थात इतरही काही महत्त्वाचे आणि चांगले बदल या धोरणात करण्यात आल्याने हे धोरण रखडलं आहे.

पण ‘लिंग’ या शब्दाबाबत साक्षरता आणि पुनर्विचाराची राज्यातल्या लोक प्रतिनिधींना गरज असल्याचं या दोन मुद्यांवरुन सध्या तरी दिसतंय.

Family Planning किटमध्ये देण्यात आले रबरी लिंग, आशा वर्करसमोर अजब समस्या

म्हणजे रबरी लिंग किटमध्ये प्रात्यक्षिकंसाठी आलंय आणि त्यावर आक्षेप असेल तर आशा वर्कर्सनी पुढे येऊन आक्षेप कशाबद्दल यावर बोललं पाहिजे. सरकारने हे रबरी लिंग किटमध्ये दिलं पण त्याचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण आशा वर्कर्स ना दिलं पाहिजे. याव्यतिरिक्त व्याकरणात आलेलं ‘लिंग ओळखा’ हे जसं स्वीकारलंय तितक्या सहजपणे कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये दिलेलं रबरी लिंग हे प्रशिक्षण देण्यासाठीचं साधन म्हणून स्वीकारलं पाहिजे. नाहीतर लिंगभेद आपल्या समाजातून पुसला जाणं कठीण आहे अध्यक्ष महाराज…

हे वाचलं का?

    follow whatsapp