अवघ्या काही तासात सचिन वाझेंची पुन्हा बदली, आता कुठे असणार वाझे? - Mumbai Tak - sachin vaze transferred to citizen facilitation center department of mumbai - MumbaiTAK
बातम्या

अवघ्या काही तासात सचिन वाझेंची पुन्हा बदली, आता कुठे असणार वाझे?

मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रांचमध्ये बदली करण्यात आली आहे. आज (12 मार्च) सकाळी अशी माहिती देण्यात आली होती. सचिन वाझे हे मुंबईच्या नागरी सुविधा केंद्र विभागात यापुढे कार्यरत असणार आहेत. पण या गोष्टीला अवघे काही तास झाले नाहीत तोच त्यांची बदली स्पेशल ब्रांचमध्ये (SB 1) झाल्याचं वृत्त […]

मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रांचमध्ये बदली करण्यात आली आहे. आज (12 मार्च) सकाळी अशी माहिती देण्यात आली होती. सचिन वाझे हे मुंबईच्या नागरी सुविधा केंद्र विभागात यापुढे कार्यरत असणार आहेत. पण या गोष्टीला अवघे काही तास झाले नाहीत तोच त्यांची बदली स्पेशल ब्रांचमध्ये (SB 1) झाल्याचं वृत्त समोर आलं. (sachin vaze transferred to mumbai police special branch 1)

थोड्या वेळापूर्वीच मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. ज्यानंतर वाझेंच्या नव्या बदलीचा निर्णय समोर आला. काल (11 मार्च) रात्री अशी माहिती समोर आली होती की, वाझेंची बदली ही नागरी सुविधा केंद्रात करण्यात आली आहे. पण आज सकाळच्या बैठकीनंतर सचिन वाझे यांची स्पेशल ब्रांचमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्पेशल ब्रांच नेमकं काय काम करतं?

मुंबई पोलिसांची SB 1 म्हणजे विशेष शाखा. या विशेष शाखेचं काम हे स्थानिक पातळीवरील गुप्त माहिती गोळा करणं ही आहे.

जेव्हा-जेव्हा मुंबईमध्ये कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे किंवा काही महत्त्वाचे इव्हेंट होत असतात तेव्हा-तेव्हा मुंबई पोलिसांची हीच विशेष शाखा यासंबंधी काही गुप्त माहिती गोळा करुन त्याविषयी योग्य तो अहवाल तयार करतं. जो अहवाल नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली करुन त्यांना मुंबईच्या नागरी सुविधा केंद्र विभागात (Citizen Facilitation Center department of Mumbai) पाठवण्यात आलं होतं. (sachin vaze transferred to citizen facilitation center department of mumbai)

काल (11 मार्च) रात्री उशिरा यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून याबाबतचा निर्णय झाला होता. त्यामुळे त्यांची सीआययू युनिटमधून थेट नागरी सुविधा केंद्र विभागात बदली झाली होती. तसेच त्यांना ताबडतोब पदभार स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले होते.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधकांनी सचिन वझेंवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांच्या अटकेची मागणी देखील केली होती. मात्र, त्यांची क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात येईल असं आश्वासन खुद्द गृहमंत्र्यांनी दिलं होतं.

‘…म्हणून सचिन वाझेंची बदली केली’, अजितदादांनी सांगितलं खरं कारण!

मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केली असावी असा संशय विमला हिरेन यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात येईल असं सरकारकडून विधीमंडळात जाहीर करण्यात आलं होतं.

याप्रकरणी विरोधकांनी प्रचंड दबाव आणल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

वाझे हे क्राईम ब्रांचमध्ये एपीआय पदावर कार्यरत होते. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे हे आपल्या पदाचा गैरवापर करुन पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे त्यांना निलंबित करुन अटक करावी अशीच मागणी विरोधकांनी केली होती. यावरुन 9 मार्चला विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला होता. दिवसभरात अनेकदा सभागृहाचं कामकाज देखील तहकूब करावं लागलं होतं.

वाझेंची बदली न केल्यास सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचं विरोधकांनी सांगितलं होतं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सरकारने वाझे यांची बदली करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 19 =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे