सिंधुदुर्ग विमानतळावर विमानाचे सुरक्षित ‘टेस्ट लँन्डिग’ ! गोवा ते सिंधुदुर्ग अवघ्या 24 मिनिटात

मुंबई तक

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पावर बुधवारी गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ असा 24 मिनिटाचा अलायन्स एअरच्या विमानाने सुरक्षित प्रवास केरून ‘टेस्ट लँन्डिंग’ यशस्वी केले. आता विमानतळ लोकार्पण सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असल्याने तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या नजरा त्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. तब्बल वीस वर्षानंतर सिंधुदुर्ग विमानतळ (चिपी) प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पावर बुधवारी गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ असा 24 मिनिटाचा अलायन्स एअरच्या विमानाने सुरक्षित प्रवास केरून ‘टेस्ट लँन्डिंग’ यशस्वी केले. आता विमानतळ लोकार्पण सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असल्याने तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या नजरा त्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.

तब्बल वीस वर्षानंतर सिंधुदुर्ग विमानतळ (चिपी) प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे आता शनिवार दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी, आयआरबी आणि विमान कंपनीने नियोजन सुरू केले आहे. विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीच गोवा ते सिंधुदुर्ग असा अलायन्स एअरच्या विमानाने अवघ्या 24 मिनिटाचा प्रवास केला. यावेळी पायलटसह टेक्निकल स्टाफ विमानासोबत होता. यावेळी विमानात इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. त्यानंतर एका तासाने अलायन्स एअरचे विमान सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवरून टेक ऑफ घेत पुन्हा गोव्याच्या दिशेने झेपावले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp