Patra chawl land scam : शिवसेना खासदार संजय राऊतांना अटक, आता पुढे काय होणार?

sanjay raut arrested by ed in money laundering case : संजय राऊतांना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयासमोर हजर केलं जाणार
sanjay raut, Patra Chawl Land Scam & ED
sanjay raut, Patra Chawl Land Scam & ED

शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी संजय राऊत यांना अटक करण्यात आली. संजय राऊतांच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. दुसरीकडे ईडीकडून आज संजय राऊत यांना न्यायालयात हजर केलं जाईल.

गोरेगावातील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांना अटक केल्यानं शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे. मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून, ईडी त्यांना (संजय राऊत) वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाईल.

ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना सुरूवातील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाणार आहेत. त्यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर केलं जाईल. संजय राऊतांच्या कोठडीची मागणी ईडीकडून केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे शिवसेनेसह सर्वांचंच लक्ष आहे.

sanjay raut, Patra Chawl Land Scam & ED
पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊतांचं नाव कसं आलं?

ताब्यात घेण्यापूर्वी संजय राऊतांच्या घरी काय घडलं?

२० जुलै आणि २७ जुलैला समन्स बजावल्यानंतर संजय राऊत हे उपस्थित राहिले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं.

दरम्यान, ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झालं. सकाळी पथक दाखल झाल्यानंतर राऊत यांना अटक होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

दुपारी चार वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरीच होते. संसदेचं अधिवेशन सुरू असताना ईडी कार्यालयात घेऊन जाऊ शकत नाही, असं संजय राऊतांकडून ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं. संजय राऊतांच्या वकिलांनीही याचं कारणावरून ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला.

sanjay raut, Patra Chawl Land Scam & ED
"अमित शाहाला तुम्ही तुरुंगात पाठवलं होतं"; रावसाहेब दानवेंनी संजय राऊतांना दिला सल्ला

नऊ ते दहा तास चाललेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना भांडुप येथील निवासस्थानावरून ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं. त्यानंतर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

संजय राऊतांचा फ्लॅट, जमीन ईडीकडून जप्त

पत्रा चाळ प्रकरणात ईडीकडून यापूर्वी संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आलेली आहे. ईडीकडून संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीनही ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in