आम्ही उचलू ती पावलं मग राजकीय असतील डोकी फुटतील – संजय राऊत

मुंबई तक

मुंबई तकः बेळगावात महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद पुन्हा चिघळलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बेळगावात तणावाचं वातावरण आहे. मराठी माणसांवर इथे जे हल्ले होताहेत ते थांबविण्यासाठी केंद्राने मध्यस्थी केली पाहिजे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच ते लाठ्या, काठ्या आणि बंदूका दाखवताहेत तर बंदूका आमच्याकडे पण आहेत. त्यांनी आम्हाला जर कठोर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई तकः बेळगावात महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद पुन्हा चिघळलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बेळगावात तणावाचं वातावरण आहे. मराठी माणसांवर इथे जे हल्ले होताहेत ते थांबविण्यासाठी केंद्राने मध्यस्थी केली पाहिजे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच ते लाठ्या, काठ्या आणि बंदूका दाखवताहेत तर बंदूका आमच्याकडे पण आहेत. त्यांनी आम्हाला जर कठोर पावलं उचलायला भाग पाडलं तर आम्ही उचलू ती पावलं मग सरकारी नसतील तर राजकीय असतील. डोकी फुटतील मग केंद्रात बोंबलत जा असा इशाराही राऊत यांनी दिला.

बेळगावात सीमावादावरुन गेल्या काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचे होणारे हाल हा चिंतेचा विषय आहे. गेले आठ दिवस जे हल्ले आणि खुनी खेळ सुरू आहेत त्यावर कोणी काहीच का बोलत नाही असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यावर बोलण्याची आणि हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे.

या हल्ल्यांविषयी बोलताना राऊत म्हणाले की एक बीजेपी स्पॉन्सर्ड संघटना आहे. जे हल्ले करताहेत. अशा प्रकारे जे हल्ले होताहेत. सीमावासीयांना पाण्यात पाहण्याचं तंत्र अवलंबलं आहे. बेळगावला महाराष्ट्रात आणायचं की नाही ते नंतर पाहू. म्हणजे आणूच. पण आधी बेळगाव भागातील कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झालीय ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. यासाठी पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तिथे जाऊन बोलणं करण्याची आवश्यकता असल्याचं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

केंद्राने हस्तक्षेप करावा

बीजेपी स्पॉन्सर्ड एक संघटन आहे. जे हल्ले करताहेत. शिवसैनिकांना हल्ले करतात हा चिंतेचा विषय आहे. याबाबत खुप मोठी चिंता आहे. बेळगावात गेले आठ दिवस जो हल्ला सुरूय. खुनी खेळ सुरूय त्यावर कोणी काहीच बोलत नाहीत. प्रधानमंत्री देखील काहीच बोलत नाहीत. ते काठ्या घेऊन डोकी फोडताहेत तर आम्ही पण दांडे घेऊन जाऊ का? आम्ही पण त्याचप्रकारे उत्तर देऊ शकतो. हा देशांतर्गत प्रकरण आहे. भारत -पाकिस्तान वाद नाही. तेव्हा याबाबत आधी कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp