Mumbai Tak /बातम्या / संजय राऊतांनी भाजपला डिवचलं, म्हणाले, ‘कसब्यात शिवसेनेमुळे BJP जिंकायचं, आता..’
बातम्या राजकीयआखाडा

संजय राऊतांनी भाजपला डिवचलं, म्हणाले, ‘कसब्यात शिवसेनेमुळे BJP जिंकायचं, आता..’

Sanjay Raut provoke to BJP: कोल्हापूर: ‘कसब्यात गेले 40 वर्ष भाजप हा फक्त शिवसेनेच्याच (Shiv Sena) पाठिंब्याने जिंकून येत होता. कसब्यात भाजपचा विजय हा शिवसेनेमुळे होत होता.. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय.’ असं वक्तव्य शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. कोल्हापुरात (Kolhapur) माध्यमांशी बोलताना त्यांनी कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणूक (Bypoll) निकालावर ही प्रतिक्रिया देत भाजपला (BJP) पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (sanjay raut lashed out at bjp saying bjp should win because of shiv sena in kasba constituency)

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

‘महाराष्ट्र किती मजबुतीने पुढे जातंय यांचं कसबा हे ज्वलंत उदाहरण आहे. ज्या कसब्यात गेले 40 वर्ष भाजप हा फक्त शिवसेनेच्याच पाठिंब्याने जिंकून येत होता. कसब्यात भाजपचा विजय हा शिवसेनेमुळे होत होता.. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय. चिंचवडचे पूर्ण निकाल येऊ द्या.. मला खात्री आहे की, चिंचवड मतदारसंघात शेवटपर्यंत भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.’

‘चिंचवडबाबत आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. कसब्याबाबत आम्ही सगळेजण खात्रीने सांगत होतो की, भाजपचा हा गड कोसळणार.. चिंचवड हा काही भाजपचा गड नाही. तो एका कुटुंबाची तिथे मक्तेदारी होती.. जगतापांची.. तिथे पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो हे माहितीए आपल्याला..’

Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

गिरीश बापट असतील.. मुक्ताताई टिळक असतील.. त्यांना सुद्धा ज्या पद्धतीने दोन-तीन वेळा विधिमंडळात मतदानासाठी आणलं.. जगतापांना देखील आणलेलं.. हे अमानुष राजकारण आहे. निष्ठा वैगरे ठीक आहे.. पक्षाप्रती वैगरे.. पण हे अमानुष आहे.. पण एक व्यक्ती जिला चालता येत नाही.. आजारी आहेत त्या.. अखेरच्या घटका मोजत असताना देखील तुम्ही तुमच्या एक-दोन मतांसाठी धरून आणलं.. लोकांना हे आवडत नाही. महाराष्ट्रात विशेषत: कसब्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच मंत्रिमंडळाने जवळजवळ कॅम्पच केला होता. पोलीस अधिकाऱ्यांचा, प्रशासनाचा वापर.. तरीही महाविकास आघाडीचे उमेदवार हे पुढे आहेत. ते जिंकून येतील.’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल : रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपने टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना तिकीट दिलं होतं. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली होती. काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती.

शरद पवार संजय राऊतांच्या पाठिशी! सत्ताधाऱ्यांना दिला इतिहासाचा दाखला

कसबा पेठ मतदारसंघातून निवडणूक लढत असलेल्या हेमंत रासने यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव केला. धंगेकर यांना तब्बल 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांना 75 हजार 449 मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना 47 हजार 296 मतं मिळाली होती. या निवडणुकीत मनसेचे अजय शिंदे यांना 8 हजार 284 मतं मिळाली होती. गेल्या निवडणुकीचा निकालातील मतांशी तुलना केल्यास भाजपची मतं घटली आहे.

खरंच केसांच्या पिनने कुलूप उघडतं का? समजून घ्या कसं बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली