नागपूरमध्ये भाजपचे प्रमुख नेते कुठे भीक मागताना दिसतात का बघतोय?; राऊतांनी उडवली खिल्ली
–योगेश पांडे, नागपूर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. सोमय्यांच्या आरोपावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली. त्याचबरोबर सोमय्या काय देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत का?, असा उलट सवालही केला. नागपूर येथे शिवसेना खासदार संजय […]
ADVERTISEMENT

–योगेश पांडे, नागपूर
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. सोमय्यांच्या आरोपावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली. त्याचबरोबर सोमय्या काय देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत का?, असा उलट सवालही केला.
नागपूर येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले,”ते (किरीट सोमय्या) काय या देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत का? जसं सिरीयल किलर असतात, काही सिरीयल रेपिस्ट असतात, तसे काही सिरीयल कम्प्लेटंट लोक आहेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून, त्यांच्यावर दबाब आणून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कारवाया करायला भाग पाडलं जात आहे.”
नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय?; सोमय्यांचा नवा सवाल