सातारा: राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही थिरकले!

Shivendrasinghraje Bhosle Dancing: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांंत शिंदेंच्या जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही ठेका धरला.
सातारा: राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही थिरकले!
satara bank election along with ncp leader bjp mla shivendrasinghraje bhosle also dancing

सातारा: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला. पण दुसरीकडे त्यांच्या विरोधकांनी संपूर्ण साताऱ्यात जल्लोष सुरु केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते हे शशिकांत शिंदेविरोधात रिंगणात उतरले होते. ज्यांना भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही पाठिंबा दिला होता.

दरम्यान, या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अक्षरश: जल्लोष केला. ज्यावेळी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे देखील त्यांच्यासोबत थिरकल्याचं पाहायला मिळालं. ज्याचा व्हीडिओ देखील आता समोर आला आहे.

यानंतर शिवेंद्रराजे यांनी माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांच्यावर बरीच टीका केली. पाहा शिवेंद्रराजे नेमंक काय म्हणाले.

'दुसऱ्यावर पराभवाचं खापर फोडणं सोपं असतं मात्र पराभव का झाला? याचा आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. पंचवीस मतदारांनी आपणाला का डावलले यामध्ये स्वतःचा काहीच दोष नाही का, काही चुका नाहीत का? याचा थोडाफार अभ्यास किंवा आत्मचिंतन केलं पाहिजे.'

पुढे शिवेंद्रराजे म्हणाले, 'जावळी तालुक्यामध्ये नेतृत्व करत असताना जेव्हा राष्ट्रवादीत होतो तेव्हादेखील ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी यांना जिल्हा परिषद सदस्य करत असताना यांनी खूप अडचणी निर्माण केल्या आणि स्वतः पक्षनिष्ठाची भाषा करायची हे योग्य नाही. पडलं तर दुसऱ्यामुळे पडलो असे खापर फोडायचे आणि निवडून आलं तर स्वतःच्या हिंमतीवर निवडून आलोय हे दाखवायचं.' असं आमदार भोसले म्हणाले.

'आपल्या चुका झाल्यात का नाही झाल्या याचा विचार करायचा असतो. षड्यंत्र वगैरे असं काही नाही. मी भाजपमध्ये असताना देखील सहकार पॅनेल बरोबर राहिलो. इतर लोकांना व पॅनलच्या लोकांबरोबर जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आता सोसायटी मतदार संघाचा प्रश्न वेगवेगळा असतो. ज्या त्या तालुक्यातला जो तो प्रश्न असतो त्यामुळे तिथे हस्तक्षेप करणे असा कुठे विषय नाही.

'जावळी तालुक्यातला हा विषय आहे. तालुक्यामध्ये दादागिरी इतक्या वर्षात होत होती या सर्व प्रकाराला एका सर्वसामान्य रांजणे सारख्या माणसाने वाचा फोडली.'

'ज्यांना कोणाला जावळी तालुकामध्ये लक्ष घालायचं आहे त्यांनी खुशाल घालावं. मी जावळी तालुक्याचा आमदार आहे. तालुक्यांमध्ये माझे असंख्य हजारो कार्यकर्ते आहेत. त्यामुळे लक्ष घातलं तरी काहीही फरक पडणार नाही. मी माझं काम करत राहणार.' असंही शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले.

satara bank election along with ncp leader bjp mla shivendrasinghraje bhosle also dancing
सातारा: 'ओ शेsssठ.. तुम्ही नादच केलाय थेट', शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याचा जबरा डान्स

'यापूर्वी देखील माझ्या मतदारसंघात कुणी ढवळाढवळ केली तरी मला फरक पडला नाही. यानंतरही केली तरी पडणार नाही. सक्षम कार्यकर्ते आणि आत्मविश्वासावर अनेक विजय यापूर्वीही मिळवलेत यानंतर मिळवणार प्रत्येक वेळी ॲक्शनला रिएक्शन मिळतील. त्यामुळे याची काळजी मी कधीच केली नाही.' असं म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Related Stories

No stories found.