Satara bank Election : भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’
–इम्तियाज मुजावर, सातारा सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या साथीने विजयाचा गुलाल उधळला आहे. बाळासाहेब पाटील यांनी माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा ८ मतांनी पराभव केला. एका-एका मतांची बेरीज करत बाळासाहेबांनी भाजपच्या भोसले गटाला जवळ करत शिष्टाईतून लढवलेल्या निवडणुकीत […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या साथीने विजयाचा गुलाल उधळला आहे. बाळासाहेब पाटील यांनी माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा ८ मतांनी पराभव केला.
एका-एका मतांची बेरीज करत बाळासाहेबांनी भाजपच्या भोसले गटाला जवळ करत शिष्टाईतून लढवलेल्या निवडणुकीत उंडाळकरांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. या विजयामुळे बाळासाहेब पाटील यांचा अनेक वर्षानंतर जिल्हा बॅंकेत पुढच्या दाराने प्रवेश नक्की झाला आहे.
जिल्हा बँक निवडणूक: मला हद्दपार करण्याचा प्रयत्न, व्याजासकट परतफेड करणार – आमदार शशिकांत शिंदे