Satara District Bank Result : शशिकांत शिंदे एका मताने पराभूत; शंभूराजे देसाईंनाही धक्का
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची जिल्हा बँक असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अखेर निकालाची प्रतिक्षा संपली असून, साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. दुसरीकडे शंभुराजे देसाई यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत चारही राजे […]
ADVERTISEMENT

पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची जिल्हा बँक असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अखेर निकालाची प्रतिक्षा संपली असून, साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. दुसरीकडे शंभुराजे देसाई यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत चारही राजे बिनविरोध निवडले गेल्याने आमदार शशिकांत शिंदे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शंभुराजे देसाई, माणचे मनोज पोळ, खटावचे नंदकुमार मोरे, कोरेगावचे शिवाजीराव महाडिक, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. निकाल समोर आले असून, शशिकांत शिंदे आणि शंभुराजे देसाई यांचा पराभव झाला आहे. तर बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला आहे.
जावली मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांच्याविरोधात ज्ञानेश्वर रांजणे यांनी अर्ज भरला होता. रांजणे यांची शेवटपर्यंत मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाले. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. जावली मतदारसंघातून 25 मतं घेत रांजणे यांनी शशिकांत शिंदेंना एका मताने पराभूत केलं आहे. एकूण मते 49 होती. त्यापैकी 48 मतं वैध ठरली. शिंदे यांना 24 मते मिळाली, तर रांजणे यांना 25 मते मिळाली.
गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई पराभूत