कोरोनाचा फटका! पुण्यात 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान होणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द
महाराष्ट्रात आणि पुण्यात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमवाली बदलण्यात येते आहे. या नव्या संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आणि पुण्यात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमवाली बदलण्यात येते आहे. या नव्या संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली आहे.
यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती आणि आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितलं आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी 13 डिसेंबरला दिली होती. मात्र हा महोत्सव आता रद्द करण्यात आला आहे.