कोरोना रूग्ण वाढल्याने औरंगाबादमधल्या पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

कोरोना रूग्ण वाढल्याने निर्णय
कोरोना रूग्ण वाढल्याने औरंगाबादमधल्या पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

कोरोनाने हात-पाय पसरण्यास सुरूवात केल्याने आता औरंगाबादमधल्याही शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तांनी घेतला आहे. कोरोनाचे रूग्ण, तसंच ओमिक्रॉन या व्हेरिएंटचे रूग्ण आढळलेल्या यासंदर्भातलं एक पत्रक काढत पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यम अशा सगळ्या शाळा बंद असतील असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

नववी ते बारावी यांचे वर्ग सुरू राणाहर आहेत. पहिली ते आठवीच्या ऑफलाईन शाळा बंद झाल्या असल्या तरीही त्यांचे ऑनलाईन वर्ग घेतले जावेत हे आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. शहरातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिका शाळांसाठी हा आदेश देण्यात आला आहे. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षा या नियोजित वेळेप्रमाणे घेतलेल्या जातील. तसंच शाळा सुरू करायच्या का? याचा निर्णय कोरोनाची 31 तारखेनंतरी स्थिती पाहून ठरवलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

शाळा-महाविद्यालयं
शाळा-महाविद्यालयं Photo- India Today

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या भागातल्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे रूग्ण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववी आणि अकरावी यांच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पुण्यातही आज असाच निर्णय घेण्यात आला. पुण्यातल्या शाळाही आता 30 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीसाठी पुण्यात होते. त्यावेळी हा निर्णय झाला.

कोरोना रूग्ण वाढल्याने औरंगाबादमधल्या पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद
मोठी बातमी! वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे मुंबईपाठोपाठ पुण्यातल्याही शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद

जे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील शाळा बंद केल्या जाव्यात, असा आग्रह पालकांकडून धरला जात होता. याबाबत काही पालकांनी महापौरांना निवेदन दिलं. त्यानंतर मंगळवारी हा निर्णय झाला आहे. अशात आता औरंगाबादमधल्याही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in