गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणात अटक, काही वेळात मिळाला जामीन
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर IPC च्या कलम 365,324, 143, 148, 506 अन्वये ही कारवाई करण्यात आली. वर्तक नगर पोलिसांनी या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यांना कोर्टापुढे हजर केलं. मॅजिस्ट्रेटनी त्यांना १० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर IPC च्या कलम 365,324, 143, 148, 506 अन्वये ही कारवाई करण्यात आली. वर्तक नगर पोलिसांनी या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यांना कोर्टापुढे हजर केलं. मॅजिस्ट्रेटनी त्यांना १० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. करमुसे यांनी हा आरोप केला आहे की जितेंद्र आव्हाड यांची माणसं माझ्या घरी आली. त्यांनी मला घरून जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं आणि तिथे मला मारहाण करण्यात आली. या सगळ्या प्रकारानंतर करमुसे यांनी तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली. मात्र कोर्टापुढे हजर करण्यात आल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. अखेर करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना अटक असं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.