दिवाळीत सोन्याची बिस्किटं, हजारो कोटींचा भ्रष्टाचार; आता परमबीर सिंग यांच्याविरोधात लेटरबॉम्ब

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अकोला: Parambir sing: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराज उर्फ भीमराव रोहिदास घाडगे यांनी 14 पानी पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लेटरबॉम्ब टाकणाऱ्या परमबीर सिंग यांच्याविरोधात लेटरबॉम्ब पडला आहे. या पत्राला परमबीर सिंग काय उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना लिहिलं आहे.

लेटरबाँब प्रकरण : राज्य सरकारकडून परमबीर सिंग यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश

काय आरोप करण्यात आले आहेत पत्रात?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त ठाणे या पदावर कार्यरत असताना प्रियदर्शनी बंगलो, कोपरी ठाणे

फ्लॅट नंबर 15 A, निलीमा अपार्टमेंट, पोलीस अधिकारी निवासस्थान, मलबार हिल या दोन शासकीय निवासस्थानांचा वापर करत होते. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला फक्त एकच शासकीय निवासस्थान वापरण्याची संमती असते. मात्र परमबीर सिंग हे दोन निवासस्थानं वापरून क्रिमिनल मिसकंडक्ट केल्याचं सिद्ध होत आहे.

ADVERTISEMENT

परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यासोबत पो. ना. प्रशांत पाटील आणि पोलीस हवालदार फ्रान्सिस डिसिल्वा हे दोघे जण दिवसरात्र असत. हे दोघे २० वर्षांपासून खासगी व्यवहार आणि बदल्यांसाठी बेनामी संपत्ती खरेदी विक्री करतात. या दोघांनाही परमबीर सिंग यांनी बेनामी संपत्ती कुठे आणि कोणाच्या नावावर घेतली आहे याची माहिती आहे. परमबीर सिंग यांनी सिंधुदुर्गात दुसऱ्याच्या नावे 21 एकर जमीन घेतली आहे.

ADVERTISEMENT

परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त होण्याआधी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण या ठिकाणी नेमणुकीस असल्यापासून प्रकाश मुथा राहणार कल्याण यांना चांगले ओळखत. हे दोघेही मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत रिव्हॉल्वर लायसन्सचे काम 10 ते 15 लाख रूपये घेऊन केले जात होते. तसंच बिल्डर लोकांची कामं कोट्यवधी रूपयांच्या देवाण घेवाण करून सेटलमेंट केली जात होती.

परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी एजंट राजू अय्यरला नेमलं होतं. त्याच्याकडे बदल्यांमधील भ्रष्टाचारानंतर रक्कम जमा केली जात होत्या.

परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी पोलीस उप आयुक्त पराग मणेरे हे देखील त्यांच्याकडे बदल्यातील भ्रष्टाचाराच्या रकमा जमा केल्यानंतर बदल्या केल्या जात होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी 50 लाख ते 1 कोटी रूपये घेतले जायचे

Hemant Nagrale Report : ‘सचिन वाझे परमबीर सिंगाचा माणूस’

परमबीर सिंग हे दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक झोनच्या डिसीपीकडून प्रत्येकी 40 तोळे सोन्याचे बिस्किट, सह पोलीस आयुक्तांकडून प्रत्येकी 20 ते 30 तोळ्याचे सोन्याचे बिस्किट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून 30 तोळ्यांपेक्षा जास्त सोन्याची बिस्किटं घेत. याचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त होता

परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचार करून मिळवलेले पैसे बिल्डर बोमन इराणी आणि रूस्तमजी यांच्याकडे गुंतवले आहेत.

परमबीर सिंग यांच्या मुलाच्या नावे सिंगापूरला व्यवसाय आहे त्यामध्ये त्यांनी 2 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे

परमबीर सिंग यांनी अँटिलिया रोड मुंबई या ठिकाणी 63 कोटी रूपये किंमतीचा बंगलावजा फ्लॅट घेतला आहे

परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त म्हणून ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी बिल्डर जीतू नवलाणी याच्याकडे सुमारे एक हजार कोटींची गुंतवणूक वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये केली आहे.

परमबीर सिंग यांची पत्नी सविता यांच्या नावाने खेतान अँड कंपनी इंडिया बुल्स इमारत सहावा मजला लोअर परळ मुंबई या ठिकाणी उघडली आहे. इंडिया बुल्समध्ये त्यांनी सुमारे 5 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. सविता सिंग या इंडिया बुल्स कंपनीच्या संचालक आहेत.

परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त म्हणून ठाण्यात कार्यरत असताना त्यांची पत्नी सविता यांना वापरण्यासाठी होंडा सिटी ही कार घेतली.

परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त ठाणे या पदावर कार्यरत असताना ते पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत असल्याने सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू होते. त्याचे दरमहा कोट्यवधी रूपये परमबीर सिंग हे त्यांच्या हस्तकांमार्फत मिळत होते.

आता या पत्रामुळे काय काय होणार? परमबीर सिंग हे त्यांचा बचाव कसा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT