शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक

फेसबुकवरील संदेश तर आणि ट्विटरवरचा डीपी बदलला
शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक

योगेश पांडे, प्रतिनिधी

रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे दोन सोशल मीडिया अकाऊंट सोमवारी तुर्कीश हॅकरने हॅक केल्याचे समोर आले. फेसबुक व ट्विटर ही दोन्ही सोशल मीडिया अकाऊंट एकाच हॅकरने हॅक केली. याबाबत खासदार तुमाने यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाला माहिती दिली आहे. फेसबुकवर तुमाने यांचे सुमारे ६० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर ते चांगलेच सक्रीय असून फॉलोअर्सची संख्याही चांगली आहे.

रविवारी जागतिक कन्या दिनी खासदार तुमाने यांनी संयुक्त राष्ट्र सभेत भारताची बाजू मांडून पाकिस्तानला इशारा देणाऱ्या स्नेहा दुबे यांची फेसबुक पोस्ट केली. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असताना सोमवारी तुर्कीश हॅकरने त्यांचे अकाऊंट हॅक केले. यानंतर त्यांचे ट्विटर अकाऊंटही याच हॅकरने हॅक केले असून त्यावरचा डीपी बदलला. सोबतच हॅकरने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर हॅकिंग केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची सायबर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

खासदार तुमाने म्हणाले, स्नेहा दुबेची पोस्ट टाकल्यावर पाकिस्तानातील कारस्तान करणारे संघटन ज्यात तुर्कीश सेक्युरिटी आर्मीचा देखील सहभाग आहे, त्यांनी अकाऊंट हॅक केले. पाकिस्तान भारतीय मुलींना घाबरतो हे या निमित्ताने समोर आले आहे.

Related Stories

No stories found.