Election Commission: Shiv Sena कोणाची शिंदे की ठाकरेंची?, आज ठरणार!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Election Commission likely to give a decision on Shiv Sena: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरू असताना दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर (Election Commission) देखील एक महत्त्वाची सुनावाणी सुरू आहे. ज्याचा निकाल आज (17 जानेवारी) येण्याची दाट शक्यता आहे. ज्यानंतर हे स्पष्ट होईल की, शिवसेना (Shiv Sena) नेमकी कोणाची तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होईल. (shiv sena party whose shinde or thackeray group is central election commission is likely to give a decision)

शिवसेना आपलीच आहे असा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) वारंवार करण्यात येत आहे. दोन्ही गटांनी आपआपली कागदपत्रं देखील आयोगापुढे सादर केली आहेत. तसेच दोन्ही 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आयोगाने पुढील सुनावणी 17 जानेवारीला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार आज आयोगासमोर पक्षाच्या नाव आणि चिन्हासाठी पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

Nihar Thackeray: काकांविरोधात पुतण्या.. दिल्लीत जाऊन शिंदेंसाठी लढला!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्या गटाला मिळणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण या दोन गोष्टींमुळे राज्यातील संपूर्ण राजकारण बदलून जाणार आहे. अशावेळी दोन्ही गट दावा करत आहेत की, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल.

‘त्या’ मुद्द्यामुळे ठाकरे गट येणार अडचणीत?

10 जानेवारी ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट यांच्यात झालेल्या युक्तिवादात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी अचानक एक मुद्दा उपस्थित करुन संपूर्ण प्रकरणालाच नवं वळण दिलं होतं. जाणून घ्या युक्तिवादातील तो नेमका मुद्दा काय होता.

ADVERTISEMENT

shiv sena symbol freeze : निवडणूक आयोग आमचा बाप नाहीये, तो केंद्राचा वेठबिगार; अरविंद सावंत भडकले

ADVERTISEMENT

‘उद्धव ठाकरेंची शिवसेनेतील नेमणूकच बेकायेदशीर’

‘1998 पर्यंत शिवसेनेची विशिष्ट अशी घटना अस्तित्वात नव्हती. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत शिवसेनेला आदेश दिल्यानंतर त्यावेळी शिवसेनची घटना तयार करण्यात आली. ज्यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, कार्यकारणी, पक्षाचं प्रमुख पद या गोष्टींसाठी नियम बनविण्यात आले. यामध्ये शिवसेनाप्रमुखाला हे कोणाचीही नियुक्ती करण्याची किंवा कोणालाही काढण्याचे अधिकार होते.’

‘मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 2018 साली उद्धव ठाकरेंनी पक्षात कोणत्याही निवडणुका न घेता थेट पक्षप्रमुख पद आणि शिवसेनाप्रमुख या पदाचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले. खरं तर उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदासाठी कार्यकारिणीच्या मंजुरीची आवश्यकता होती. पण त्यांनी तसं न करता. आपल्या काही जवळच्या लोकांना हाताशी घेऊन गुप्तपणे स्वत:ला पक्षप्रमुख म्हणून परस्पर नेमलं. त्यामुळे हे पद आणि त्यानंतर शिवसेनेत केलेल्या नेमणुका याच बेकायदेशीर आहेत.’ असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी आयोगासमोर केला होता.

आता आयोग हा मुद्दा लक्षात घेणार की, इतर मुद्देही लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणातील रंगत अधिकच वाढणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT