Madha Lok sabha Election 2024 : ''म्हातारं लय खडूस आहे, तिजोरीची चावी कमरेला लावून हिंडतंय अन् अजितदादा...'', सदाभाऊ खोतांचं भाषण व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

sadabhau khot criticize sharad pawar madha lok sabha election 2024 ajit pawar ncp crisis
साहेबांना काय काम आहे? गुरं राखायची आहेत की शेतावर जायचं आहे?
social share
google news

Sadabhau Khot Criticize Sharad Pawar : '' म्हातारं लय खडूस आहे, तिजोरीची चावी कमरेला लावून हिंडतंय, त्यामुळे अजितदादा किल्लीकडे बघून बघून म्हातारं झालंय, असा टोला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) लगावला. तसेच म्हातारं कमरेची चावी आपल्याला देणार नाही म्हणूनच अजित दादांनी किल्ली तोडण्याची भूमिका घेतल्याचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी यावेळी सांगितले.  (sadabhau khot criticize sharad pawar madha lok sabha election 2024 ajit pawar ncp crisis) 

ADVERTISEMENT

माढा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून बोलताना सदाभाऊ खोत यांनी गावरान भाषेत शरद पवारांवर हल्ला चढवला होता. ही लढाई वाडा विरूद्ध गावगाड्याची आहे. ही लढाई प्रस्थापित विरूद्ध विस्थापितांची आहे. म्हणून या मतदार संघात पवार साहेब कुणालाही देऊन जातील, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. 

हे ही वाचा : सुप्रीम कोर्टाचा झटका! EVM ला क्लिनचीट, न्यायालयाचा फैसला काय?

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले,  ''काही जण म्हणतात, आता साहेबांचं वय 84 आहे आणि ते आता 84 सभा घेणार आहेत. आता साहेबांना काय काम आहे?  गुरं राखायची आहेत की शेतावर जायचं आहे? पण साहेबांना मानावं लागेल ते या वयातही आमच्या सारख्यांना चान्स देत नाही.पोरग कर्तबगार झालं की बाप प्रपंच त्याच्या हातात देतो आणि गप्प बसतो की नाही. पण हे म्हातारं लय खडूस आहे, तिजोरीची चावी कमरेला लावून हिंडतंय, अजितदादा किल्लीकडे बघून बघून म्हातारं झालं'', अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.

अजित दादाला लक्षात आलं की म्हातारं कमरेची किल्ली आपल्याला देणार नाही. त्यामुळे अजित दादा किल्ली लोंबकळत लोंबकळत दादा म्हणत आहेत किल्ली तोडल्या शिवाय थांबणार नाही. म्हणून दादा मोठ्या ताकदीने विकासासाठी भाजपासोबत आले असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Sunil Tatkare : "शरद पवार मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर पाठिंबा देणार होते"

दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांच्या बाजूने उभे आहे. आणि या कुटुंबातील सदस्यांकडून अजित पवारांवर सातत्याने टीका होत आहेत. या संदर्भात एका भाषणात आपल्याला एकटे पाडल्याचा उल्लेख देखील अजित पवारांनी केला होता. त्यानंतर आता अजित पवारांची बाजू भक्कम करण्यासाठी आणि शरद पवारांवर हल्ला चढवण्यासाठी आता महायूतीतील इतर नेते व घटकपक्ष मैदानात उतरताना दिसतायत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT