Shiv Sena: 'येऊ दे राणा, मैं झुकेंगा नही...', 80 वर्षांच्या आजीने 'मातोश्री'समोर ठोकला तळ

Shiv sena vs Rana: राणा दाम्पत्याविरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाले असून यामध्ये 80 वर्षांच्या आजी देखील पुढे सरसावल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी राणा दाम्पत्याला खास 'पुष्पा' स्टाइलमध्ये आव्हान दिलं आहे
Shiv Sena: 'येऊ दे राणा, मैं झुकेंगा नही...', 80 वर्षांच्या आजीने 'मातोश्री'समोर ठोकला तळ
shiv sena vs navneet ravi rana matoshree 80 year old lady challange to rana couple

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणांच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर बरंच तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ठाण मांडून बसले आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीबाहेर देखील शेकडो शिवसैनिक काल रात्रीपासूनच बसून आहेत.

या सगळ्यात मात्र एका 80 वर्षीय शिवसैनिक आजींची आता बरीच चर्चा सुरु आहे. शिवसेनेला आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्यासमोर आपण झुकणार नाही असं म्हणत त्यांनी थेट राणा दाम्पत्याला आव्हान दिलं आहे. याच आजींना स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन आपली काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

याच आजीबाईंसोबत 'मुंबई Tak'ने खास बातचीत केली आहे. पाहा त्यावेळी त्या नेमकं काय म्हणाल्या.

पाहा 'त्या' आजीबाई नेमकं काय म्हणाल्या:

माझं साहेबांसोबत बोलणं झालं.. ते म्हणाले की, तुम्ही आराम करा.. काळजी घ्या तुमची.. तुम्ही येऊन बसा निवांत... त्यांना मी असंही म्हणाले की, मातोश्रीवर आत बोलवतात ना आम्ही आत येणार नाही. इथून आम्ही हलणार नाही म्हणजे नाही. 'ती' आल्याशिवाय आम्ही काही हलणार नाही. तुमच्यासाठी आम्ही इथेच बसून राहणार.'

दरम्यान, यावेळी आजीबाईंनी खास स्टाइलमध्ये राणा दाम्पत्याला आव्हानही दिलं. आजींनी 'पुष्पा' सिनेमातील प्रसिद्ध डायलॉगही म्हटला. त्या म्हणाल्या की, 'मरेंगा पर झुकेंगा नही..' चंद्रभागा शिंदे असं या डॅशिंग आजींचं नाव आहे. ज्या 80 वर्षाच्या आहे.

राणा दाम्पत्य 'मातोश्री'वर जाण्याबाबत ठाम

खासदार नवनीत राणा आणि रवि राणा हे कधी घराबाहेर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष अद्यापही लागून राहिलं आहे. त्यात काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झालेले असताना हा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये आमदार रवी राणा म्हणत आहेत, 'हनुमान आणि प्रभु रामचंद्र यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी... ज्या पद्धतीने शेतकरी, शेतमजूर आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला लागलेली शनि, या शनिवारच्या दिवशी, मातोश्री आमचं हृदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे. त्याठिकाणी जाऊन हनुमान चालीसा वाचणार आहे.'

shiv sena vs navneet ravi rana matoshree 80 year old lady challange to rana couple
'तुम्ही सुद्धा कधीतरी एकटे गाडीने जाणार आहात', आशिष शेलारांचा शिवसेनेला थेट इशारा

दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार थोड्या वेळातच राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेऊन आपली नेमकी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करणार आहे.

Related Stories

No stories found.