पूर्वीसारखा Congress पक्ष आता राहिला नाही, संघाचं देशभरातलं जाळं हीच भाजपची ताकद – शिवसेनेचं टीकास्त्र

मुंबई तक

राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारमध्ये आगामी काळात पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी डरपोक कार्यकर्त्यांची पक्षाला गरज नाही असं म्हटल्यानंतर शिवसेनेने सामना या अग्रलेखातून काँग्रेसच्या धोरणांवरच शंका निर्माण केली आहे. पूर्वीसारखा काँग्रेस पक्ष आता राहिलेला नसल्याचं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. सत्ता असेल किंवा नसेल पक्षासाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारमध्ये आगामी काळात पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी डरपोक कार्यकर्त्यांची पक्षाला गरज नाही असं म्हटल्यानंतर शिवसेनेने सामना या अग्रलेखातून काँग्रेसच्या धोरणांवरच शंका निर्माण केली आहे. पूर्वीसारखा काँग्रेस पक्ष आता राहिलेला नसल्याचं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सत्ता असेल किंवा नसेल पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे लोकचं पक्ष आणि संघटना टिकवू शकतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे अशी लोकं आता राहिलेली नाहीत. प्रियंका गांधी शिकस्त करतील पण कार्यकर्त्यांना उर्जा देणं गरजेचं आहे. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही, असे राहुल गांधी म्हणतात ते योग्यच आहे. पण डरपोक जात राहिले तर काँग्रेस पक्षात हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे का ते पहावं लागेल असा बोचरा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

यावेळी स्वातंत्र लढ्यात काँग्रेसचं मोठं योगदान आहे. निर्भयपणे काँग्रेसचे पुढारी आंदोलनात उतरले, इंग्रजांशी झुंज दिली. गांधी, नेहरु, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, लालबहादुर शास्त्री असे असंख्य पुढारी जेलमध्ये गेले, अनेकांनी छातीवर गोळ्याही झेलल्या. हे धाडस स्वातंत्र्य चळवळीत संघाने दाखवलं नाही. लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांचं धाडस तर विरळाच. सावरकरांचा काँग्रेसशी संबंध नव्हता तसाच तो संघाशीही नव्हता. भाजपचा जन्मही झाला नव्हता तेव्हा काँग्रेस पक्ष डरपोक नव्हता, हिंमतवाला होता. देशभक्तीशी त्यांचं अतुट नातं होतं, पण तो पक्ष आज उरलेला दिसत नाही अशीही टीका शिवसेनेने केली आहे.

राहुल गांधी ज्यावेळी रस्त्यावर उतरतात तेव्हा भोवताली गर्दीचा मोहाल बनतो. पण संघर्षात सातत्य असायला हवं, राजकारणात प्रवाह थांबला की त्याचं डबक होतं हे लक्षात ठेवायला हवं. संघ परिवारावर हल्ला केल्याने काँग्रेस किंवा इतर सेक्युलर पक्ष किती बळकट होणार आहेत? संघाचे देशभरात पसरलेलं जाळे हीच भाजपची खरी ताकद आहे. संघाला वजा केलं तर भाजप पांगळा होईल हे सत्य आहे. संघाच्या विचारांशी अनेकांचे मतभेद असू शकतात, पण अनेक क्षेत्रात संघ करत असलेलं काम हे महत्वाचं आहे. सर्वस्व झोकून देऊन काम करणारे स्वयंसेवक संघात आहेत. असे काम करणारे लोकं पूर्वी काँग्रेसमध्ये होते. असं म्हणत शिवसेनेने राहुल गांधींच्या भाषणाचा समाचार घेतला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp