औरंगाबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून बहिणीला कोयत्याने गळा चिरून संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-इसरार चिश्ती, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये सैराट सिनेमात दाखवल्याप्रमाणे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची कोयत्याचे वार करून हत्या केली आङे. औरंगाबादमधल्या लाडगावमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. किशोरी मोटे असं 19 वर्षीय मुलीचं नाव असून तिच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा आरोपी अल्पवयीन आहे असं समजतं आहे. रविवारी तो लाडगावमध्ये गेला होता त्यावेळी त्याने रागाच्या भरात बहिणीची गळा चिरून हत्या केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली असून, प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भावानेच सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. तो मूळचा गोयेगाव येथील रहिवासी आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सहा महिन्यापूर्वी केला होता प्रेमविवाह

सहा महिन्यापूर्वी 19 वर्षीय किशोरीने पळून पुण्यातील आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते औरंगाबादेतील लाडगाव या परिसरात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच किशोरीचा भाऊ हा लाडगावला आला. त्यानंतर बहिणीला तू पळून प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला. त्यानंतर शाब्दिक वादानंतर राग अनावर झालेल्या भावानेच जवळ असलेल्या कोयत्याने सख्या बहिणीवर सपासप वार केले.

ADVERTISEMENT

उल्हासनगर : धक्कादायक! 27 वर्षीय जावयाचा 45 वर्षीय सासूवर बलात्कार

ADVERTISEMENT

भावाने इतक्या क्रूर पद्धतीने वार केले की बहिणीचे मुंडके शरीरा वेगळं झालं. हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवण्य़ासाठी धावपळ केली. शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत, आरोपी भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतले आहे.

Nagpur Crime : वयोवृद्ध महिला डॉक्टरची गळा चिरुन निर्घृण हत्या, शहरात खळबळ

काय होतं सैराट सिनेमात?

सैराट सिनेमात आर्ची आणि परशा हे दोघे घरातल्यांच्या विरोधात जाऊन लग्न करतात. घरातून पळून जाऊन ते वेगळे राहात असतात. सिनेमाच्या शेवटी तिचा भाऊ तिला भेटायला येतो आणि तो आर्ची आणि परशा दोघांनाही ठार करतो. त्यातून रक्ताळलेल्या पावलांनी त्यांचं मूल चालत असतं. त्याला काहीही कळत नाही की आपल्या आई वडिलांसोबत नेमकं काय झालं आहे इतकं ते मूल लहान असतं. ऑनर किलिंग या विषयावर भाष्य करणारा हा वास्तवदर्शी सिनेमा होता. आता औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सगळ्यांना याच सिनेमाची आणि या सिनेमातील या शेवटच्या दृश्याची आठवण झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT