समीर वानखेडेंवरील आरोपाची चौकशी करणाऱ्या SIT ने नोंदवले आणखी दोन व्यक्तींचे जबाब

दिव्येश सिंह

आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या SIT ने आज आणखी दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. साईलने केलेल्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT ची नेमणूक केली आहे. SIT ने आज रणजितसिंह बिंद्रा आणि मयुर घुले या दोन व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. आर्यन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या SIT ने आज आणखी दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. साईलने केलेल्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT ची नेमणूक केली आहे. SIT ने आज रणजितसिंह बिंद्रा आणि मयुर घुले या दोन व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत.

आर्यन खानच्या अटक प्रकरणात किरण गोसावी आणि समीर वानखेडेंनी खंडणी मागितल्याचा आरोप साईलने केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळेला किरण गोसावीने सॅम डिसुझाला शाहरुख खानशी संपर्कात राहण्यासाठी सांगितलं होतं. यानंतर त्याने मयुर घुले या आपल्या मित्राशी संपर्क साधला आणि त्याला वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. हे रेस्टॉरंट रणजितसिंह बिंद्रा चालवतात. यावेळी बिंद्राने गोसावीला आपला शाहरुख खानशी कोणताही संपर्क नसल्याचं सांगितलं. परंतू बिंद्राने आपण चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेशी आपण संपर्क साधून देऊ शकतो असं सांगितलं.

‘मुलांनी मित्र गमावले, मला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं’

यानंतर चिक्की पांडेने बिंद्राच्या सांगण्यावरुन शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीचा नंबर गोसावीला मिळवून दिला. यानंतर गोसावीच्या फोनवरुन आर्यन खानचा मेसेज रेकॉर्ड करुन पाठवण्यात आला. यानंतर पुजा ददलानी ही आर्यनच्या सुटकेसाठी मागितलेल्या खंडणीच्या रकमेसाठी गोसावी आणि सुनील पाटील यांच्याशी संपर्कात होती.

रणजितसिंह बिंद्रा हा डॉन इक्बाल मिर्चीशी संबंधित व्यक्ती आहे ज्यासाठी ईडीने त्याच्यावर याआधी कारवाई केली आहे. याव्यतिरीक्त बिंद्राचे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासोबत व्यवसायिक संबंध आहेत.

आर्यन समीर वानखेडेंना म्हणाला, ‘तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करेन’

के.पी.गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईलने प्रसारमाध्यमांशी बोलताना, गोसावी आणि सॅम डिसुझा आर्यनच्या सुटकेसाठी २५ लाखांची मागणी करत असल्याचं ऐकलं असं सांगितलं होतं. या खंडणीतले ८ कोटी हे समीर वानखेडेंना जाणार होते अशीही माहिती साईलने पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान आर्यन खान प्रकरणासह ५ प्रकरणांमध्ये NCB चे समीर वानखेडे यांच्या चौकशीचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणी आगामी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp