दारू पिऊन रोज शिवीगाळ करणाऱ्या वडिलांना मुलाने डोक्यात दगड घालून संपवलं, इंदापूरमधली घटना
वडील दारू पिऊन रोज शिवीगाळ करत होते आणि त्रास देत होते या रागातून पोटच्या मुलानेच त्याच्या वडिलांची हत्या केली आहे. इंदापुरातल्या मदनवाडी गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. राजेंद्र छगन कुंभार असं या अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. Crime: कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या […]
ADVERTISEMENT

वडील दारू पिऊन रोज शिवीगाळ करत होते आणि त्रास देत होते या रागातून पोटच्या मुलानेच त्याच्या वडिलांची हत्या केली आहे. इंदापुरातल्या मदनवाडी गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. राजेंद्र छगन कुंभार असं या अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.
Crime: कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांचा खून
वडील दारू पिऊन त्रास देतात या कारणावरून राजेंद्रने त्याच्या वडिलांची डोक्यात दगड घालून हत्या केली. इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र कुंभार याने भिगवण पोलीस ठाण्यात येवून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझे वडील छगन गजानन कुंभार यांचे डोक्यात दगड टाकून त्यांचा खून केला आहे अशी माहिती दिली.
क्रुरतेचा कळस ! दोन महिन्याच्या मुलीची आईकडून हत्या, ओव्हनमध्ये मिळाला मृतदेह