उस्मानाबादमध्ये 'लालपरी'वर दगडफेक; बससेवा सुरु ठेवण्यावर प्रशासन ठाम

महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची एसटी कामगारांची मागणी : दोन बसेसवर दगडफेक, गुन्हा दाखल
उस्मानाबादमध्ये 'लालपरी'वर दगडफेक; बससेवा सुरु ठेवण्यावर प्रशासन ठाम
उस्मानाबाद आगाराच्या याच बसवर दगडफेक करण्यात आली.

महिनाभरापासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला असला, तरी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना दिसत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी कर्मचारी कामावर परतले असून, बसेसही धावताना दिसत आहे. उस्मानाबाद आगारातून काही बस सोडण्यात आल्या. मात्र, दोन बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

उच्च न्यायायलयाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारने संप थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. पगारवाढीच्या निर्णयानंतर काही ठिकाणी कर्मचारी कामावर परतले आहेत. तर काही ठिकाणी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे.

कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी बस सोडल्या जात असून, आज सकाळी उस्मानाबाद आगारातून पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र, दोन बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. उस्मानाबाद-उमरगा ही बस उमरगा येथून परत निघाली होती. उमरगा शहराबाहेरील चौरस्ता येथे बसला लक्ष्य करत दगडफेक करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत उस्मानाबाद-पुणे बसवर दगडफेक करण्यात आली आहे. उस्मानाबाद-पुणे बसवर कौडगाव येथे अज्ञातांना बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी एसटी प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन बसवर दगडफेक केल्याच्या घटनेनंतरही एसटी प्रशासनाने बससेवा सुरुच ठेवण्याची भूमिका ठेवली आहे. 'बसवर दगडफेक करण्यात आली असली, तरीही बस सेवा सुरूच ठेवणार आहे, अशी माहिती उस्मानाबादचे विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली. जिल्ह्यात 2,766 पैकी 374 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामध्ये 18 चालक व 18 वाहकांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.