दुर्दैवी ! ऑनलाईन वर्गासाठी स्मार्टफोन नसल्यामुळे विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्या सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आले आहेत. राज्य सरकारने ऑनलाईन वर्ग घेण्याची परवानगी दिली आहे. परंतू अकोल्याच्या भीमनगर भागातील एका विद्यार्थिनीने ऑनलाईन वर्गासाठी स्मार्टफोन नसल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पायल गवई असं या विद्यार्थिनीचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येचा गुन्हा दाखल […]
ADVERTISEMENT
राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्या सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आले आहेत. राज्य सरकारने ऑनलाईन वर्ग घेण्याची परवानगी दिली आहे. परंतू अकोल्याच्या भीमनगर भागातील एका विद्यार्थिनीने ऑनलाईन वर्गासाठी स्मार्टफोन नसल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पायल गवई असं या विद्यार्थिनीचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
पायलच्या घरची परिस्थिती बेताची होती. अकोल्यातल्या मोहरीदेवी खंडेवाल शाळेत दहावीत शिकणाऱ्या पायलने ऑनलाईन वर्गांसाठी आपल्या पालकांकडे स्मार्टफोन मागितला होता. २३ एप्रिलपासून राज्यात दहावीची परीक्षा सुरु होणार आहे, त्याआधी शाळेत होणाऱ्या ऑनलाईन वर्गांना पायलला स्मार्टफोन नसल्यामुळे उपस्थित राहता येत नव्हतं. पायलचे वडील हे मजुरी करतात तर तिची आई ही शेतात मजुरी करुन घर चालवते. अशा परिस्थितीत मुलीला अभ्यासासाठी स्मार्टफोन देणं गवई कुटुंबाला जमणारं नव्हतं. केवळ स्मार्टफोन नसल्यामुळे आपला अभ्यास बुडत असल्यामुळे अखेरीस पायलने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.
पायलच्या अचानक निघून जाण्यामुळे गवई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी पायल ही वर्गातली हुशार मुलगी होती. परंतू आपल्या शिक्षणासाठी आई-बाबांकडे स्मार्टफोन घ्यायला पैसे नसल्यामुळे पायलने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पायलच्या आत्महत्येच्या कारणाचां तपास केला जात आहे. एकीकडे राज्य सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहे, परंतू राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी-सुविधा मिळत आहेत की नाही याकडे कोणाचंही लक्ष नाहीये.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT