महाराष्ट्रात दिवसभरात 13 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, दिवसभरात 94 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 13 हजार 758 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 57 लाख 33 हजार 215 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.89 टक्के इतकं झालं आहे. आज राज्यात 6 हजार 279 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. आज राज्यात 94 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर हा 1.98 टक्के इतका आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 96 लाख 69 हजार 693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 79 हजार 51 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 71 हजार 685 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 4 हजार 472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 24 हजार 398 नवे रूग्ण आहेत. आज राज्यात 6 हजार 270 नवीन रूग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 59 लाख 79 हजार 51 झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 94 मृत्यूंपैकी 77 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 17 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 258 ने वाढली आहे. हे 258 मृत्यू, पुणे-114, नाशिक-68, नागपूर-22, ठाणे-18, अहमदनगर-13, रत्नागिरी-4, सांगली-4, रायगड-3, सातारा-3, सिंधुदुर्ग-3, कोल्हापूर-2, अकोला-1, बीड-1, धुळे-1 आणि सोलापूर-1 असे आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई – 18 हजार 529

ADVERTISEMENT

ठाणे – 13 हजार 681

ADVERTISEMENT

पुणे – 16 हजार 827

मुंबई, पुणे आणि ठाण्यात अद्यापही सक्रिय रूग्णसंख्या ही 10 हजारांपेक्षा जास्त आहे. हेच आजची संख्या सांगते आहे.

मुंबईत 27 जूनपर्यंत Level 3 चे निर्बंध

27 जूनपर्यंत मुंबई Level 3 मध्येच राहणार आहे असं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. मुंबईमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी होतो आहे. तरीही लेव्हल थ्रीचे जे नियम आहेत तेच मुंबईत लागू असणार आहेत 27 जूनपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. मुंबईची लोकसंख्या, एकंदरीत भौगोलिक परिस्थिती आणि मुंबईत प्रवास करणारे प्रवासी यांचा विचार करून अद्याप तरी लेव्हल थ्रीचेच नियम लागू राहतील

    follow whatsapp

    ADVERTISEMENT