जामीन मिळण्यासाठी आर्यन खानने अर्जात सांगितली ही 15 कारणं..

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NCB ने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर त्याला जामीनही मिळू शकलेला नाही. त्याला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात आर्यन खानने NCB च्या अर्जावर बुधवारी उत्तर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या जामीन अर्जामध्ये त्याने आपल्याला जामीन का मिळावा? याची पंधरा कारणं दिली आहेत. आपण जाणून घेऊ आर्यन खानने काय म्हटलं आहे या जामीन अर्जात.

ADVERTISEMENT

अभिनेता शाहरूख खान याचं नाव न घेता त्याने अर्जात हा उल्लेख केला आहे की मी बॉलिवूडमधील एका आघाडीच्या चित्रपट अभिनेत्याच्या मुलगा आहे. तसंच कॅलेफोर्नियातूनही मी ललित कला, चित्रपट आणि टीव्ही संदर्भातली पदवी घेतली आहे. मी भारताचा एक जबाबदार नागरिक आहे असंही त्याने आपल्या जामीन अर्जात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आर्यन खानने आपल्या जामीन अर्जात काय काय कारणं दिली आहेत?

1) मी निर्दोष असून मी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. ड्रग्ज आणि क्रूझ पार्टी प्रकरणात मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

2) माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ हे NCB ला मिळालेले नाहीत. मला 2 ऑक्टोबरच्या रात्री ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळी माझ्याकडे काहीही आढळून आलं नाही

ADVERTISEMENT

3) माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले नाहीत. जे काही आरोप झाले आहेत त्याची शहानिशा केल्याशिवाय मला या सगळ्या प्रकरणात गोवण्यात आलं आहे.

4) NDPS कायद्यातले गुन्हे अजामीनपात्र आहेत ही बाब मान्य केली तरीही या कायद्यांच्या अंतर्गत माझ्यावर आरोप करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसलेलं हे प्रकरण आहे

5) मी वयाने तरूण आहे आणि माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. याआधी कोणत्याही प्रकारच्या ड्रग्ज प्रकरणाशी माझा संबंध जोडण्यात आलेला नाही तसा आरोपही माझ्यावर झालेला नाही.

6) माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप NDPS कायद्याच्या कलम 37 द्वारे करण्यात आले आहेत. मात्र माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मी काहीही अंमली पदार्थ बाळगले होते असे आढळून आलेले नाही.

7) माझ्या मनाचा आणि मानसिकतेचा विचार न करता NDPS कायदा 1985 च्या कलम 37 अन्वये माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत.

8) मी कोणत्याही प्रकारे ड्रग्ज बाळगलेले नव्हते. माझ्याजवळ कोणतंही अंमली पदार्थ किंवा नशा येणारी सामग्री आढळळी नाही.

9) मी बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्याचा मुलगा आहे. (असं म्हणत असताना आर्यनच्या अर्जात वडील शाहरुख खान यांचं नाव लिहिलेलं नाही)

10) मी ललित कला, सिनेमॅटिक आर्ट्स, फाईन आर्ट्स आणि टीव्ही चित्रण यासंबंधीची डिग्री घेतली आहे, कॅलिफोर्निया येथील विद्यापीठातून मी ही डिग्री मिळवली आहे.

11) मी आपल्या देशाचा एक जबाबदार नागरिक आहे त्यामुळे मला जामीन देण्यात यावा असंही या अर्जात नमूद कऱण्यात आलं आहे.

12) मी कोणत्याही ड्रग पेडलरसोबत संपर्कात नाही

13) ड्रग्जची खरेदी विक्री, तस्करी यांच्याशी माझा काहीही संबंध नाही

14) मला जामीन मिळाल्यास मी माझ्या स्वातंत्र्याचा कोणताही गैरवापर करणार नाही

15) माझी कौटुंबिक पार्श्वभूमीही अत्यंत चांगली आहे त्यामुळेही मला जामीन मंजूर करण्यात यावा असंही या अर्जात म्हटलं गेलं आहे.

कोणत्याही कथित उल्लंघनामध्ये थोड्या प्रमाणात समावेश आहे, या उल्लंघनास कठोर कारावास आणि एक वर्षापर्यंतच्या शिक्षेस किंवा दंड जो रु. 10,000 किंवा दोन्हीसह. अशाप्रकारे, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या अनुसूची II च्या तरतुदींसह वाचलेला हा विभाग सध्याचा गुन्हा, जर असेल तर, तो जामीनपात्र स्वरूपाचा असेल.

प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळे आर्यन खान पार्टीमधे गेला होता’

आर्यन खान हा कोणत्याही प्रकराच्या ड्रग्ज खरेदी विक्री, उत्पादन, जवळ बाळगणं, ड्रग्जची वाहतूक करणं, आयात किंवा निर्यात करणं किंवा त्यासाठी पैसे पुरवणं, तस्करीशी जोडला आहे असं म्हणणं अशी स्थिती नाही. म्हणूनच एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत कोणत्याही गुन्ह्याचे घटक खानच्या संदर्भात प्रथमदर्शनी केलेले नाहीत.

आर्यन खान हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह मुंबईचा रहिवासी आहे. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आहे. जामीन मंजूर झाल्यास आर्यन खान त्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करेल असं घडणार नाही त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात यावा असं म्हटलं गेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT