Shiv Sena नेत्याच्या मुलाच्या लग्नात गर्दी जमवत Corona चे नियम धाब्यावर; गुन्हा दाखल

मुंबई तक

कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकीकडे सरकारी यंत्रणा जनतेला गर्दी करु नका आणि नियमांचं पालन करण्याची सक्ती करत आहेत. परंतू दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले कार्यकर्तेच सरकारी नियमांना हरताळ फासत असल्याचं समोर येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य असलेल्या देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नात सर्व नियम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकीकडे सरकारी यंत्रणा जनतेला गर्दी करु नका आणि नियमांचं पालन करण्याची सक्ती करत आहेत. परंतू दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले कार्यकर्तेच सरकारी नियमांना हरताळ फासत असल्याचं समोर येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य असलेल्या देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नात सर्व नियम मोडत सुमारे २ हजारांची गर्दी जमा झाली होती.

या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी नवरदेवाचे वडील, सासरे, मंगल कार्यालयाचा मालक आणि इतर ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

शिवसेनी किल्ल्याच्या पायथ्याशी बारव भागात झालेला हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत होता. दोन दिवस चाललेल्या या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय मंडळी, आजी-माजी आमदार हजर होते. महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम सखाराम लांडे,बाळू सखाराम लांडे, एकनाथ सिताराम कोरडे (रा. माणकेश्वर) व चैतन्य उल्हास मिंडे( रा.तांबे ता. जुन्नर जि.पुणे व सुधीर नामदेव घिगे (रा. दुधनोली ता.मुरबाड जि.ठाणे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.