चुकीच्या पद्धतीने पोलिओची लस दिल्यामुळे लहान मुलीचा मृत्यू? वडिलांची तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी

ADVERTISEMENT

वाशिमच्या मंगरुळपीर येथील लिंबी गावात एका दोन महिन्यांच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सृष्टी आडे असं या मुलीचं नाव असून तिच्या वडीलांनी आपल्या मुलीचा मृत्यू चुकीच्या पद्धतीने पोलिओची लस दिल्यामुळे झाल्याचा आरोप केला आहे. पोलिओची लस दिल्यानंतर सृष्टीची तब्येत बिघडून तिचा मेंदू बंद झाला. यानंतर तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल केलं असता तिचा १५ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहेत सृष्टीच्या वडीलांचे आरोप?

हे वाचलं का?

सृष्टीचे वडील केशव आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिओचा लस घेण्याआधी तिची तब्येत अगदी ठणठणीत होती. पोलिओची लस देण्याआधी सृष्टीला डॉक्टरांनी चार इंजेक्शन देऊन नंतर पोलिओचा डोस दिला. यानंतरच तिची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. आपल्या मुलीचा मृत्यू डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं सृष्टीच्या वडीलांचं म्हणणं आहे, या घटनेविरुद्ध सृष्टीच्या वडीलांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान याबद्दल वाशिम जिल्ह्याचे बाल संगोपन अधिकारी डॉ. मोबिन खान यांना विचारलं असता त्यांनी, सृष्टीचा मृत्यू हा लसीमुळे झाला नसावा असं सांगितलं आहे. “पोलिओचा डोस हा शासनाच्या नियमानुसार दिला जातो. सृष्टीचा पोलिओचा डोस हा ८ तारखेला दिला होता. त्याच दिवशी गावातील इतर मुलांनाही हा डोस दिला गेला. परंतू इतरांना कसलाही त्रास आणि इन्फेक्शन झालं नाही.”

ADVERTISEMENT

भरधाव कार ट्रेलरवर आदळली; पती-पत्नीसह पाच महिन्याच्या मुलाचा मृत्यू

ADVERTISEMENT

पोलिओ सारखे आजार होऊन भविष्यात लहान मुलांना अपंगत्व येऊ नये यासाठी शासनाकडून दरवर्षी पोलिओचे डोस दिले जातात. परंतू अशा घटनेमुळे संपूर्ण मोहीमेला गालबोट लागण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता प्रशासन काय कारवाई करतं याकडे लक्ष लागलेलं आहे.

व्हिडीओ कॉल करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा नंतर गळफास घेऊन मुलाने संपवलं आयुष्य

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT