'मी बोललो होतो की, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील', राज ठाकरेंचा प्रचंड खळबजनक दावा
Raj Thackeray: मुंबई Tak जय हिंद कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी दावा केला की, 'काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. मी हे ही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील.' असा खळबजनक दावा राज ठाकरेंनी केला.
ADVERTISEMENT

पुणे: 'मला गेले दीड, दोन वर्ष जे जाणवत होतं काश्मीरबद्दलचं.. अनेकांशी मी गेले वर्षभर बोलतोय.. की, काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. तुमचा विश्वास नाही बसणार.. मी हे ही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील.' असा अत्यंत खळबजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबई Tak जय हिंद कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे.
मुंबई Tak जय हिंद उत्सव या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विशेष मुलाखत घेण्यात आली. ज्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ला, भारताचा पाकिस्तानवर हल्ला या सगळ्याबाबत राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे.
हे ही वाचा>> 'ठाकरे-पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न, पण... मी लिहून देतो', राज ठाकरेंचं जय हिंद उत्सवात मोठं विधान
'शपथपूर्वक सांगतोय.. हे मी गेले वर्षभर सांगतोय...', दहशतवादी हल्ल्याबाबत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'तुम्ही मला म्हणाले ना मघाशी की, सगळे उजीवकडे जातात आणि तुम्ही डावीकडे जातात.. पण मला काही धोके दिसतात.. तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही. आता ती व्यक्ती नाही इथे.. पण अनेक जण आहेत ज्यांच्या मी तुम्हाला भेटी करून देईन. मी कोणी ज्योतिषी नव्हे.'
'मी अनेकदा सांगितलं आहे.. मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं आठवतंय तुम्हाला? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल.. मागील 3-4 वर्षांपूर्वी.. सांगितलं होतं आठवतंय तुम्हाला? मी भाषणातच सांगितलं होतं. यावेळेला ही गोष्ट फक्त मी बोललो नाही. कारण मला कोणत्याही प्रकारची हिंट द्यायची नव्हती.'










