अंडरवेअरवरून हत्येचा उलगडा, प्रिन्सिपल मॅडमने प्रेमविवाह केलेल्या पतीसोबत का केलं असं?

मुंबई तक

महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात एका मुख्याध्यापिकेने आपल्या पतीला विष देऊन संपवून टाकल्याची बातमी समोर आली आहे. मुख्याध्यापिकेची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आणि यामध्येच हत्येमागचं कारण समोर आलं.

ADVERTISEMENT

अंडरवेअरवरून हत्येचा उलगडा, प्रिन्सिपल मॅडमने प्रेमविवाह केलेल्या पतीसोबत का केलं असं?
अंडरवेअरवरून हत्येचा उलगडा, प्रिन्सिपल मॅडमने प्रेमविवाह केलेल्या पतीसोबत का केलं असं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्याध्यापिकेने विष देऊन पतीला संपवलं

point

विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट

point

अंडरवेअरवरुन झाला प्रकरणाचा खुलासा

Crime news: महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात शाळेच्या एका मुख्याध्यापिकेने आपल्या पतीची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीला मारल्यानंतर शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याचा मृतदेह जंगलात जाळून टाकला. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तपास सुरु असतानाच मुख्याध्यापिकेची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आणि यामध्येच हत्येमागचं कारण समोर आलं. 

खरंतर, 15 मे रोजी यवतमाळ शहराच्या जवळील चौसाळा जंगलात एक जळलेल्या मृतदेह आढळला. दरम्यान, पोलिसांच्या तपासात या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. यामध्ये एका मुख्याध्यापिकेने आपल्या पतीला विष देऊन मारल्याची बाब समोर आली आणि तिने शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने रात्री जंगलात त्याचा मृतदेह जाळून टाकल्याची माहिती समोर आली. 

एका वर्षापूर्वीच केला प्रेमविवाह

या बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने आरोपी निधी शांतनू देशमुख आणि शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. चौसाळा जंगलात जळलेल्या सापडलेला मृतदेह दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शंतनू देशमुखचा असल्याचे उघड झाले. शांतनू देशमुख हे सनराइझ इंग्लिश मीडियम शाळेतील शिक्षक होते आणि त्यांची पत्नी निधी देशमुख ही त्याच शाळेची मुख्याध्यापिका होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि म्हणून त्यांनी एक वर्षापूर्वीच प्रेमविवाह केला होता. 

हे ही वाचा: Extra Marrital Affairs : पत्नीसोबत प्रियकराला नवऱ्यानं पकडलं रंगेहाथ, पोलीस ठाण्यात जाताच म्हणाली मला...

लग्नानंतर ते दोघे आपल्या आई वडिलांपासून वेगळे राहत होते. गेल्या काही दिवसांत त्या दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. शांतनूकडून सतत त्रात होत असल्यामुळे त्यांच्या पत्नीने शांतनूच्या हत्येचा प्लॅन बनवला. यासाठी तिच्याकडे ट्यूशनला येणाऱ्या विद्यार्थ्यांची तिने मदत घेतली. यामुळे 13 मे रोजी निधीने शांतनूला विष देऊन मारून टाकलं. हत्येनंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना घरी बोलवून त्यांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावली.

एका अंडरवेअरमुळे झाला खुलासा

दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची ओळख पटण्याची निधीला आता भिती वाटत होती. त्यामुळे ती रात्री जंगलात गेली आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मृतदेहाच्या अंगावरील मिळालेल्या शर्ट आणि त्याच्या बटणाच्या आधारे तपास सुरू ठेवला. यानंतर शांतनूच्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावरुन त्या मृतदेहाची ओळख पटली. 

हे ही वाचा: 5 खासदार असलेल्या विमानावर हवेतच कोसळली वीज, उलट्या काळजाच्या पाकिस्ताननं तरीही 'नको' तेच केलं!

यानंतर पोलिसांनी निधीची चौकशी केली, त्यावेळी सुरुवातीला ती पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु घरात सापडलेली अंडरवेअर आणि मृतदेहावर सापडलेली अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांना त्याबाबतीत संशय आला आणि निधावर या सगळ्याचा दबाव असल्यामुळे तिने तिचा गुन्हा कबुल केला. निधीच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी तिला आणि तिला मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 109 आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp