मुंबई : बोलायचं आहे म्हणून नेलं अन् चौघांनी केला सामूहिक बलात्कार; गोवंडीतील धक्कादायक घटना
– एजाज खान कामावरून परतणाऱ्या एका तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मुंबईतील गोवंडी भागात घडली आहे. एका झोपडीत नेऊन आरोपींनी तरुणीवर अत्याचार केले आणि फरार झाले. तरुणीने घटनास्थळावरूनच पोलिसांना फोन करून आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघांपैकी दोन नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोवंडीतील शिवाजीनगर भागात […]
ADVERTISEMENT

– एजाज खान
कामावरून परतणाऱ्या एका तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मुंबईतील गोवंडी भागात घडली आहे. एका झोपडीत नेऊन आरोपींनी तरुणीवर अत्याचार केले आणि फरार झाले. तरुणीने घटनास्थळावरूनच पोलिसांना फोन करून आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघांपैकी दोन नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गोवंडीतील शिवाजीनगर भागात तरुणीवर सामूहिक अत्याचाराची ही घटना घडली. कामावरून घरी जात असतानाच ओळखीतील तरुणानेच विश्वासघात करत तिला निर्मनुष्य ठिकाणी नेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुलढाणा : गळफास घेताना सेल्फी घेत विवाहीतेची आत्महत्या, पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल