लोकल सुरू, पण मुंबईकर अजूनही बसच्या रांगेत

मुंबई तक

सोमवारपासून तब्बल 10 महिन्यांनी सामान्यांसाठी मुंबई लोकल धावू लागली. पण याच्या आनंदापेक्षा ठरवून दिलेल्या वेळांबाबतची नाराजीच मुंबईकरांच्या मनात अधिक होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुंबई लोकल पुन्हा सुरु करण्याची घोषणा झाल्याने पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकल पर्यंत अशा तीन टप्प्यांमध्येच सामान्यांसाठी लोकल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

सोमवारपासून तब्बल 10 महिन्यांनी सामान्यांसाठी मुंबई लोकल धावू लागली. पण याच्या आनंदापेक्षा ठरवून दिलेल्या वेळांबाबतची नाराजीच मुंबईकरांच्या मनात अधिक होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुंबई लोकल पुन्हा सुरु करण्याची घोषणा झाल्याने पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकल पर्यंत अशा तीन टप्प्यांमध्येच सामान्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे लोकलच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना लोकलचा फायदा झालाच नसल्याचं, बसच्या रांगांपासून त्यांची सुटका झाली नसल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं.

हा व्हिडिओ देखील पहा..