बीड : ८ तासांत तिघांच्या आत्महत्या, माजलगाव तालुक्यातील घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात आठ तासात राजेवाडी, राजेगाव आणि केसापुरी कॅम्प येथे तिघांनी वेगवेगळ्या कारणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंत या घटना समोर आल्यामुळे गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

१९ ते ४० वयोगटातील तिघांनी आत्महत्या करुन जीवन संपवल्यामुळे सध्याच्या काळात लोकं नैराश्येच्या गर्तेत अडकत चालले आहेत का यावर विचार करण्याची गरज असल्याचं पुढे आलं आहे. पहिल्या घटनेत, मुळचे धारूर येथील रहिवासी शिक्षक सुरेश रामकिसन बडे हे माजलगाव शहरालगत केसापुरी कॅम्प येथे राहत होते. त्यांनी नैराश्यातून आज पहाटे ३ वाजता घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बडे यांच्या निदर्शनास आली.

व्हिडीओ कॉल करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा नंतर गळफास घेऊन मुलाने संपवलं आयुष्य

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसऱ्या घटनेत राजेवाडी येथील कृष्णा बाळासाहेब कोके या युवकाने बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास बेल्टच्या सहाय्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत तालुक्यातील राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड यांनी पैशाच्या सततच्या तगाद्याला कंटाळून गावातील एका व्यक्तीच्या शेतातील लिंबाच्या झाडाला पहाटे ४ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येच्या या घटनेने तिन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. या आत्महत्या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT