मोसंबी घेऊन जाणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक, तीन जण ठार; एक जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोली – वाशिम महामार्गावर ट्रक आणि टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पवन गायकवाड राहणार नांदेड, मेहमुद खान राहणार राजस्थान आणि हरेंदर चौधरी राहणार राजस्थान अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नावं आहेत.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिमवरुन मोसंबी भरुन निघालेला टेम्पो नांदेडच्या दिशेने निघाला होता. हा टेम्पो हिंगोलीजवळ आला असताना कलगाव शिवारात वळण रस्त्यावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.आरजे-२१-जीए-५५३२) टेम्पोला धडक दिली. ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

अपघाताची माहिती मिळताच बासंबा पोलीस  विभाच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीस बाहेर काढलं आहे. जखमी व्यक्तीवर हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचाप सुरु करण्यात आले. परंतू त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे. हा अपघात ट्रक ड्राइव्हर विरुद्ध देशेने ट्रक नेत असल्यामुळे झाला असल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

या अपघातामुळे हिंगोली ते वाशिम मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी रात्रीच क्रेनच्या मदतीने वाहने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. अपघातात जखमी झालेले अशोक कदम यांच्यावर सध्या नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ADVERTISEMENT

गोंदिया : नाकाबंदीदरम्यान साडेसात लाखांचा गांजा जप्त, दोन आरोपींना अटक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT