सोलापूर: नियंत्रण सुटलं आणि तीन जणांनी गमावला जीव, स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात

मुंबई तक

विजयकुमार बाबर, सोलापूर: विजापूर-सोलापूर महामार्गावरा औरादजवळ एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. स्कॉर्पिओ कार झाडाला धडकल्याने हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. सोलापूरमधील तेरा मैलजवळील वकील वस्ती रस्तावर पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर: विजापूर-सोलापूर महामार्गावरा औरादजवळ एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. स्कॉर्पिओ कार झाडाला धडकल्याने हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

सोलापूरमधील तेरा मैलजवळील वकील वस्ती रस्तावर पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ज्यामध्ये तीन जणांना हकनाक आपला जीव गमवावा लागला. औराद ते सोलापूर या दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याने समोरच्या झाडाला जोरदार धडक दिली आहे.

तेरा मैल येथील लिंबाच्या झाडाला स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने ही घटना घडली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर अन्य गंभीर जखमी तीन जणांना उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन जण ठार 15 ते 17 जण जखमी

हे वाचलं का?

    follow whatsapp