धुळे : शेतातील झोपडीला आग, तीन वर्षांच्या चिमुरड्याचा होरपळून मृत्यू
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालु्क्यात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. पढावद तालुक्यात एका शिवारात झोपडीला लागलेल्या आगीत तीन वर्षांच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. लहानग्या मुलाला त्याच्या बहिणीसोबत सोडून मजुरीला जाणं आईला चांगलंच भोवलं आहे. मुलाला त्याच्या बहिणीसोबत एकट सोडून आई शेजारील शेतात मजुरीच्या कामाला गेली होती. बहिणीसोबत खेळल्यानंतर हा चिमुरडा आपल्या झोपडीत झोपून […]
ADVERTISEMENT
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालु्क्यात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. पढावद तालुक्यात एका शिवारात झोपडीला लागलेल्या आगीत तीन वर्षांच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. लहानग्या मुलाला त्याच्या बहिणीसोबत सोडून मजुरीला जाणं आईला चांगलंच भोवलं आहे.
ADVERTISEMENT
मुलाला त्याच्या बहिणीसोबत एकट सोडून आई शेजारील शेतात मजुरीच्या कामाला गेली होती. बहिणीसोबत खेळल्यानंतर हा चिमुरडा आपल्या झोपडीत झोपून गेला. यावेळी अचानक झोपडीला आग लागल्यामुळे बाहेर खेळत असलेली बहीण घाबरुन गावाच्या दिशेने धाव घेतली.
जेवताना टेबलला धक्का लागल्याचं निमीत्त, मारहाणीत तरुणाचा मृत्यू
हे वाचलं का?
घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केलं होतं ज्यामुळे अग्नीशमन दलाला पाचारण करावं लागलं. अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होताच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. परंतू तोपर्यंत आतमध्ये झोपलेल्या चिमुकल्याचा मृत्यू झालेला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT